HW News Marathi
महाराष्ट्र

नानाच्या नाना तऱ्हा!! ‘सकाळी आयसोलेशन अन् रात्री सेलिब्रेशन!, भाजपचा टोला

मुंबई | आयसोलेशनमध्ये असतानाही जुहू येथील सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर भाजपने टीका केली आहे. सकाळी आयसोलेशन आणि रात्री सेलिब्रेशन. नानाच्या नाना तऱ्हा, असं म्हणंत भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

नाना पटोले यांनी त्यांच्या कुटुंबातील एकाला कोरोनाची लागण झाल्याने काही दिवस आयसोलेशनमध्ये राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र, त्यानंतरही काल (१९ फेब्रुवारी) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जुहू येथील आयोजित कार्यक्रमात भाग घेतला होता. नाना पटोले यांनी स्वत: ट्विट करून त्यांचा कार्यक्रमातील फोटोही शेअर केला होता. त्यावरून भाजप नेते प्रसाद लाड यांनी नाना पटोले यांच्यावर टीका करणारं ट्विट केलं आहे.

प्रसाद लाड काय म्हणाले?

नानाच्या नाना तऱ्हा!! ‘सकाळी आयसोलेशन अन् रात्री सेलिब्रेशन! हाच आहे काँग्रेसचा तमाशा… स्वतःचे कार्यक्रम जोशात साजरे करायचे आणि असेच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरे करणाऱ्यांना १४४ कलम लावून अटक करायचं, अशी टीका करतानाच नानाजी मांजरा सारखं वागताय, डोळे मिटून सगळे नियम मोडताय!, असा टोलाही लाड यांनी लगावला आहे. आता यावर नाना पटोले आपल्या स्टाईलमध्ये काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकासआघाडीतून बाहेर, राजू शेट्टींची मोठी घोषणा

Aprna

RSS चे हेडक्वार्टर असलेल्या नागपुरातही कोरोनाचा हाहाकार का? राजू शेट्टींचा चंद्रकांत पाटील यांना सवाल

News Desk

विकास कामांचा बोलाचा भात बोलाची कढी! – भालचंद्र शिरसाट

Aprna