HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

वाधवान प्रकरणी उशिरा का होईना पण शहानपण आले !

मुंबई |  वाधवान कुटंबीयांचा क्वॉरंटाईन काळ आज (२२ एप्रिल) दुपाी २ वाजता संपला. आणि त्यानंतर त्यांना सीबीआयकडे सुपूर्द करण्याचे शहाणपण उशिरा का होईना पण गृहमंत्र्यांना आले असा टोला विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनाी लगावला आहे. त्यामूळे कायदा मोडून लोकांना सहकार्य केले जाणार नाही याची खबरदारी सरकारने घ्यावी अस सल्लाही यावेळी दरेकरांनी दिला.

गृहमंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे वाधवान कुटुंब महाबळेश्वरमध्ये पोहोचले. दरम्यान,या वाधवान कुटुंबाचा क्वॉरन्टाईन काळ आज दुपारी २ वाजता संपत असून आम्ही ईडी आणि सीबीआयला पत्र लिहून त्यांचा ताबा घेण्याची विनंती केली आहे,” अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. गृहमंत्र्यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधत ही माहिती दिली होती.

काय होते वाधवान प्रकरण?
लॉकडाऊन आणि संचारबंदी असतानाही डीएचएफएल आणि येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबातील 23 जणांसह सात गाड्यांमधून मुंबईहून महाबळेश्वरला गेल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे त्यांच्याकडे गृह मंत्रालयाचे विशेष सचिव अमिताभ गुप्ता यांचे पत्र मिळाले. यानंतर वाधवान कुटुंबीयांना प्रवासाची परवानगी देणारे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. त्यांच्याविरुद्धची चौकशी संपेपर्यंत ते सक्तीच्या रजेवर असतील, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार वाधवान कुटुंबावर गुन्हा दाखल झाला होता. परंतु वाधवान कुटुंबाला सीबीआयने ताब्यात घेतलं नव्हते. वाधवान कुटुंबापैकी काही जणांना कोरोनाव्हायरसची लागण झालेली असू शकते, अशी शंका असल्याने सीबीआयने अख्ख्या कुटुंबाला क्वॉरन्टाईन करण्याचा निर्णय घेतला होता.कपिल वाधवान, धीरज वाधवान रियल इस्टेट कंपनी एचडीआयएल (HDIL), फायनान्स कंपनी डीएचएफएल (DHFL) सह अनेक कंपन्यांचे मालक आहेत. वाधवान बंधु डीएचएफएल आणि येस बँक घोटाळ्याप्रकरणी जामीनावर बाहेर आहे. याशिवाय वाधवान बंधु पीएमसी बँक घोटाळ्यातही आरोपी आहेत.

 

Related posts

छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांकडे पाकिस्तानी लष्कराची शस्त्रे ?

News Desk

कलाकारांवर टीका करतांना तारतम्य बाळगा, दरेकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावर प्रिया बेर्डेंचा संताप!

News Desk

Bhandara Hospital Fire | आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ! प्रकाश आंबेडकरांची मागणी

News Desk