HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

‘…पंतप्रधान पाणीही विचारत नाही’, संजय राऊतांची नाराजी!

नवी दिल्ली। भाजपविरोधात विरोधी पक्षातील नेते एकवटण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांना एकत्र करत मोदी सरकारला घेरण्यासाठी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. राहुल गांधी यांनी देशातील विरोधी पक्षांच्या खासदारांची एक बैठक बोलावली होती, या बैठकीत 14 पक्षांचे जवळपास 100 खासदार उपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे. राहुल गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, आप, नॅशनल कॉन्फरन्स, भाकप, माकप, राजद पक्षांच्या राज्यसभा आणि लोकसभेच्या खासदारांचा समावेश आहे.

संजय राऊत यांची नाराजी

यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘चाय पे चर्चा’ वरुन टिका केली आहे. लगावण्याची संधी सोडली नाही. पंतप्रधान पाणी देखिल विचारत नाही अस सांगत नाराजी व्यक्त केली आहे.

14 विरोधी पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित

कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये मीटिंगसाठी राहुल गांधी यांनी 14 विरोधी पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केले होते. यामध्ये राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सदनातील खासदारांचा समावेश आहे. या बैठकीत सर्व नेते सभागृहातील उपस्थित होणाऱ्या मुद्द्यांबाबत सरकारवर दबाव वाढवण्याच्या मार्गावर चर्चा करतील.

मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न

संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पहायला मिळत आहे. विविध मुद्द्यांवरुन विरोधक मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. विरोधकांच्या गोंधळामुळे वारंवार संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब करावे लागत आहे.

Related posts

मोदींच्या आवाहनाला बळी पडून लाईट बंद करू नका ,उर्जामंत्र्यांचं आवाहन !

Arati More

सह्याद्रीतील नव्या वनस्पतीला दिले शरद पवारांचे नाव!

News Desk

…तर विधानसभेत आपणही मेरिटमध्ये येऊ शकतो !

News Desk