Site icon HW News Marathi

वर्सोवा-घाटकोपर मेट्रो वन सेवा उद्या ‘या’ वेळेत असणार बंद

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर वर्सोवा-घाटकोपर मेट्रो वन (Versova-Ghatkopar Metro One) सेवा उद्या (18 जानेवारी) सायंकाळी 5. 45 वाजल्यापासून ते रात्री 7.30 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहनही मेट्रो वनकडून करण्यात आले आहे. तसेच पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात त्यांची जाहीर सभा होणार आहे.

“परिचालन आणि प्रशासकीय कारणांमुळे मेट्रो सेवा ही उद्या सायंकाळी 5.45 वाजल्यापासून ते 7.30 वाजपर्यंत वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावरील मेट्रो सेवा बंद राहणार आहे. कृपया तुमच्या प्रवासाचे नियोजन करा”, असे आवाहन करणारे फलक मेट्रो वनकडून प्रत्येक स्थानकात लावण्यात आले आहे. मेट्रो वनकडून प्रवाशांची गैरसोयीबद्दल दिलगीर केली आहे. पंतप्रधान मोदी हे मुंबई दौऱ्यादरम्यान जाहीर सभा आणि  मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ उद्घाटन करणार आहे.

दरम्यान पंतप्रधान हे अंधेरी पूर्व येथील मेट्रो 7 च्या गुंदवली मेट्रो स्टेशनवर होणार असून वर्सोवा-घाटकोपर मेट्रो 1 च्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवे स्टेशनच्या जवळ आहे. यामुळे वर्सोव-घाटकोपर ही मेट्रो वन ही सेवा बंद ठेवली जाणार आहे.

 

Exit mobile version