नवी दिल्ली | देशात, महाराष्ट्रात एकीकडे कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना दुसरीकडे आरोग्य व्यवस्थेवर ताण पडत आहे. महाराष्ट्राला रेमडेसिविरचा पुरवठा थांबवल्याचा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केल्यानंतर आता कॉंग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनीही देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्ष सुनावले आहे. रेमडेसिवीर औषधाचा पुरवठा आणि साठेबाजीवरून महाराष्ट्रात राजकारण तापलं असताना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे
“भाजप नेत्याचे हे कृत्य मानवतेविरोधात,” असल्याची घणाघाती टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे. प्रियंका.गांधी म्हणाल्या की, “देशातील कानाकोपऱ्यात लोक रेमडेसिवीर औषध मिळावे यासाठी वणवण फिरत आहेत. आपला जीव वाचावा म्हणून रेमडेसिवीर इंजेक्शन मिळावे यासाठी लोक सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत एका जबाबदार पदावर राहिलेले भाजपचे नेते रेमेडेसिवीर ओषधाची साठेबाजी करतात हे मानवतेविरोधात आहे.”
जब देश के कोने-कोने से लोग रेमडेसिविर उपलब्ध कराने की गुहार लगा रहे हैं और तमाम लोग जान बचाने के लिए किसी तरह एक शीशी रेमडेसिविर जुटाने के लिए जद्दोजहद कर रहे हैं, उस समय जिम्मेदार पद पर रह चुके भाजपा नेता का रेमडेसिविर की जमाखोरी करने का कृत्य मानवता के खिलाफ अपराध है। pic.twitter.com/arIl5fTnGO
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) April 19, 2021
काय आहे प्रकरण?
दमणच्या ब्रुक फार्मा या कंपनीकडे तब्बल ६० हजार रेमडेसिवीरचा साठा असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शनिवारी (१७ एप्रिल) मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर हे बीकेसी येथील पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी आक्षेप नोंदवला होता.
विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून रेमडेसिवीर दिलं जात असल्याने मंत्र्याचा सहायक धमकी देतो तसंच पोलीस त्यामुळेच ताब्यात घेतात असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. तर व्यावसायिकाला वाचवण्यासाठी फडणवीस पोलीस स्टेशनला का गेले असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.