HW News Marathi
क्राइम

पूजा ददलानीवर मुंबई पोलिस नोंदविणार खंडणीचा गुन्हा?

मुंबई | आर्यन खान ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आता अडचीत सापडण्याची शक्यता आहे. पूजा ददलानीला तीन दिवसांपूर्वी समन्स बजावण्यात आले होते. मात्र, प्रकृतीचे कारण सांगून वेळ वाढवून मागितली होती. पूजा ददलानीचा जबाब नोंदविण्यात अडचणी येत असल्यामुळे गुन्हा नोंद करायचा कसा? असा प्रश्न पोलिसांसमोर आहे. कारण पूजा हिच त्यावेळी घटनास्थळी उपस्थित होती. तिच्या जबाबाशिवाय पोलिसांनी खंडणीचा गुन्हा नोंदविता येणार नाही, असं सूत्रांकडून सांगितलं जात आहे. जर पूजा ददलानी तिचा जबाब नोंदवायला आली नाही तर मुंबई पोलिस कायदेशीर मत घेऊन याप्रकरणी सुओमोटो एफआयआर दाखल करायचा की नाही याचा निर्णय घेतील. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत १५ जणांचे जबाब नोंदवले आहेत.

हे प्रकरण दाबण्यासाठी खंडणी देण्यात आल्याचा आरोप एनसीबीचा पंच प्रभाकर साईलने केला होता

याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत १५ जणांचे जबाब नोंदवले आहेत. मुंबई पोलिसांनी सॅम डिसूझालाही समन्स बजावले असून आतापर्यंतच्या तपासात समीर वानखेडे किंवा एनसीबीच्या कोणत्याही अधिकाऱ्याचा थेट संबंध सिद्ध झालेला नाही.गेल्या २ ऑक्टोबरला आर्यन खानला ड्रग्सप्रकरणी अटक करण्यात आली. हे प्रकरण दाबण्यासाठी खंडणी देण्यात आल्याचा आरोप एनसीबीचा पंच प्रभाकर साईलने केला होता. त्याने सॅम डिसूझा आणि केपी गोसावीचा उल्लेख केला होता. तसेच पूजाने आर्यनला वाचविण्यासाठी के. पी. गोसावीला ५० लाख रुपये दिल्याचा गौप्यस्फोट सॅम डिसूझाने केला होता.

शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीचं लोअर परळमधलं मर्सिडीज कारचं सीसीटीव्हीही फुटेज एसआयटीच्या हाती लागलं आहे. ५० लाख रुपयांची डील याच ठिकाणी झाल्याचं बोललं जातं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या शारीरिक चाचणीनंतर चारच तासात गुणवत्ता यादी जाहीर

Aprna

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येमागे सनातन संस्थाच…

News Desk

विरोध असताना मुलीचे लग्न लावले, सहा महिन्यांनी केला जावयचा खून

News Desk