HW News Marathi
महाराष्ट्र

पदवीधर निवडणुकीच्या निकालाआधी पुण्यात आघाडी सरकारची बॅनरबाजी

पुणे | राज्यातील ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. उमेदवारांसह कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मतदार या निवडणुकीच्या निकालाकडे डोळे लावून बसले आहेत. यामध्ये पुणे पदवीधर मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यानुसार आता निकालांचा पहिला कल येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांनी मुसंडी मारल्याचं पाहायला मिळत आहे. तर भाजपचे संग्राम देशमुख पिछाडीवर आहेत. अशात महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्या विजयाचे फ्लेक्स पुण्यात झळकले आहेत.

पुण्यात सारसबाग चौकात पर्वती मतदारसंघाचे राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अमोल ननावरे यांनी हे बॅनर लावले आहेत. निकाल येण्यास जवळपास ४० तास लागतील असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला. मात्र, त्याआधी राष्ट्रवादीने अरुण लाड यांच्या विजयाचे बॅनर लावले आहेत. या बॅनरची शहरात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, ही निवडणुक आघाडी सरकार आणि भाजप या दोघांसाठी अतिशय महत्वाची आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊत यांनी कुटुंबाची माफी मागितली नाही तर… भाजप आमदाराचा इशारा

News Desk

भाजप आमदाराच्या 500 कोटी प्रकरणाची चौकशी का नाही? भावना गवळींचा थेट सवाल!

News Desk

मराठा विरुद्ध इतर समाज असा संघर्ष निर्माण करण्याचा भाजपचा डाव – सचिन सावंत  

News Desk