HW News Marathi
महाराष्ट्र

पुणे महानगरपालिका आता राज्यातील सर्वात मोठी मनपा ! २३ गावांचा नव्याने समावेश

पुणे। पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत आता तब्बल २३ गावांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून जोर धरत होती. या मागणीवर अखेर राज्य शासनाने आता शिक्कामोर्तब केले आहे. या संदर्भात शासन निर्णय सुद्धा जाहीर कऱण्यात आला असून, पुणे महानगरपालिका क्षेत्राच्या सीमात बदल करण्याच्या दृष्टीने त्यामध्ये काही क्षेत्रांचा समावेश करण्याचं म्हटलं होतं. त्यानुसार सर्व हरकती आणि सूचनांचा शासनाने विचार करत आज (३०जूनला) २३ गावांचा पुणे मनपात समावेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

पुणे महानगरपालिका हद्दीत २३ गावांचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. त्यानुसार आता याबाबत प्रत्यक्ष कार्यवाही चालू होणार असून, या निर्णयाचं कृती समितीने स्वागत करत म्हटलं, हा निर्णय नक्कीच अभिनंदनीय असून समाविष्ट २३ गावातील विकासकामांचा मार्ग मोकळा झालेला आहे. याठिकाणी नियोजनबध्द विकास होणे शक्य होणार आहे. याठिकाणी रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज, कचरा, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक वाहतूक, हे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. म्हणून आता २३ गावातील राहणीमानाचा दर्जा देखील सुधारणार असून शहरीकरणाचा वेग वाढणार आहे.

‘ती’ २३ गावे कोणती ?

  • खडकवासला
  • किरकटवाडी
  • कोंढवे धावडे
  • मांजरी बुद्रूक
  • नांदेड
  • न्यू कोपरे
  • नऱ्हे
  • पिसोळी
  • शेवाळवाडी
  • काळेवाडी
  • वडाची वाडी
  • बावधन बुद्रूक
  • वाघोली
  • मांगडेवाडी
  • भिलारेवाडी
  • गुजर निंबाळकरवाडी
  • जांभूळवाडी
  • होळकरवाडी
  • औताडे हांडेवाडी
  • सणसनगर
  • नांदोशी
  • सूस
  • म्हाळुंगे

या २३ गावांचा पुणे मनपात समावेश करावा अन्यथा स्वतंत्र महानगरपालिका तयार करावी अशी मागणी ग्रामस्थ आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून वारंवार होत होती. तर राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ते प्रवीण तुपे यांनी हडपसर मनपा निर्मितीची मागणी केली होती. पण अखेर आज राज्य शासनाकडून या २३ गावांचा समावेश पुणे मनपात करण्याच्या संदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे नागरिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळालय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

समाज हादरुन गेलाय’, चंद्रकांत पाटलांची कठोर शिक्षेची मागणी!

News Desk

निवडणुका होऊ द्या, मग…! धनंजय मुंडे-पंकजा मुंडे पुन्हा आमने-सामने

News Desk

टी-१ वाघिणीच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांमध्ये जल्लोषाचे वातारण

swarit