HW News Marathi
महाराष्ट्र

पुणे शिक्षक मतदार संघाच्या पहिल्या फेरीत काँग्रेसचे जयंत आसगांवकर आघाडीवर!

पुणे | राज्यात सध्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुक सूरू आहे. १ डिसेंबरला यासाठी मतदान झाले होते. तर ३ डिसेंबरला मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, पुणे शिक्षक मतदार संघाच्या पहिल्या फेरीचे निकाल समोर आले आहेत.

यात काँग्रेस पक्षाचे उमेदवार जयंत आसगांवकर आघाडीवर आहेत. तर भाजप पुरस्कृत उमेदवार जितेंद्र पवार पिछाडीवर आहेत. जयंत आसगांवकर यांना १६८७४ इतकी मते मिळाली आहेत तर जितेंद्र पवार यांना ५७९५ इतकी मते मिळाली आहेत. तर दत्तात्रय सावंत, अपक्ष यांना ११०२४ इतकी मते मिळाली आहेत. ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

पुणे शिक्षक मतदारसंघासाठी वाजता मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. विजयासाठी उमेदवाराला पहिल्या पसंतीत २५, ११४ मते प्राप्त करावी लागणार आहेत. त्यानुसार शिक्षक मतदारसंघातून एकाही उमेदवाराला पहिल्या पसंतीत एवढे मताधिक्य प्राप्त करणे शक्य झालेले नाही. सद्यस्थितीला महा विकास आघाडीचे उमेदवार जयंत आजगावकर आणि अपक्ष उमेदवार तथा विद्यमान आमदार दत्तात्रेय सावंत यांच्यामध्ये चुरस निर्माण झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व निवडणूक प्रक्रिया स्थगित

swarit

“आणखी किती जणांचा मृत्यू झाल्यावर सरकारला जाग येणार?”, फडणवीस आक्रमक

News Desk

नितेश राणेंना मुंबई उच्च न्यायालायचा दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Aprna