HW News Marathi
महाराष्ट्र

सभा गाजवणाऱ्या गुलाबराव पाटलांनी गायली कव्वाली, सर्वांनाच केलं मंत्रमुग्ध


जळगाव। शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांना आपण नेहमीच सभा, मेळावा किंवा कार्यक्रमात मंचावरुन भाषण देताना बघितले आहे. सभेदरम्यान गुलाबराव पाटलांचा आक्रमकपणाही पाहिला असेल परंतु एका कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला. गुलाबराव पाटील यांनी कार्यक्रमात चढता सुरज धीरे धीरे ही अजीझ नाझा यांची कव्वाली गायली आणि उपस्थित सर्वांनाच मंत्रमुग्ध करुन टाकले आहे.शिवेसना नेते गुलाबराव पाटील जळगावात एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम घेण्यात आला होता. राज्यात सगळीकडेच दिवाळी निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमांना नेते मंडळीही हजेरी लावत आहेत. तसेच कार्यक्रमात नेत्यांमधील कला पाहायला मिळत आहेत.

चढता सुरज धीरे धीरे ही अजरामर कव्वाली गुलाबराव पाटलांकडून

गुलाबराव पाटील अशाच एका कार्यक्रमासाठी जळगावमध्ये उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार गुलाबराव पाटील यांनी कव्वाली गायली. चढता सुरज धीरे धीरे ही अजरामर कव्वाली गुलाबराव पाटील यांनी सुरात गायली. यामुळे उपस्थित सर्वच गुलाबरावांच्या कव्वालीला दाद देत होते. तसेच सभा गाजवणाऱ्या गुलाबराव पाटील यांना एवढ्या सुरात कव्वाली गाताना पाहून कार्यकर्तेही अचंबित झाले होते. कव्वाली गातानाचा गुलाबराव पाटील यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गुलाबराव पाटील हे कार्यकर्त्यांच्या घोळक्यामध्ये बसून कव्वाली गात आहेत. तसेच त्यांना एक ढोलकी पटू साथ देत आहे. व्हिडिओतील सर्वच उपस्थित गुलाबराव पाटील यांची कव्वाली ऐकून मंत्रमुग्ध झाले असल्याचे पाहायला मिळाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तर एसटी कर्मचाऱ्यांचा थेट वाढीव पगार रोखण्याचा इशाराच”- अनिल परब

News Desk

महाराष्ट्रात तौत्के चक्रीवादळाचा हैदोस, पोलीस महासंचालक संजय पांडे हॉलिडेवर, शिवसेनेची कारवाईची मागणी

News Desk

अमित साटम यांनी PAP घर खरेदीत भ्रष्टाचार केल्याबद्दल सेनेला फटकारले

Aprna