HW News Marathi
देश / विदेश

माझे नाव राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे !

नवी दिल्ली | “माझे नाव राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे,” त्यामुळे मी माफी मागणार नाही,” असे म्हणत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली. राहुल गांधी पुढे म्हणाले की, “जर कोणाला माफी मागायची असेल तर मोदींचे असिस्टंट असलेल्या अमित शहांनी माफी मागावी,” अशा शब्दात त्यांनी अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक, ढासळती अर्थव्यवस्था, वाढती बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्या अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर काँग्रेसने आज (१४ डिसेंबर) मोदी सरकारविरोधात रामलीला मैदानात ‘भारत बचाव रॅली’ आयोजन करण्यात आले आहे. यावेळी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी भाजप आणि मोदी सरकारवर निशाणा साधला.

झारखंडच्या प्रचार सभेत देशातील बलात्काराच्या वाढत्या घटनांवर बोलताना राहुल गांधी यांनी ‘मेक इन इंडिया नाही’ तर ‘रेप इन इंडिया’, असे वक्तव्य केले होते. राहुल गांधींनी या वक्तव्यावरून माफी मागावी अशी मागणी लोकसभेत काल (१३ डिसेंबर) भाजपच्या महिला खासदारांनी केली होती. राहुल गांधींनी देशातील महिलांचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी महिलांची माफी मागावी, अशी मागणी करत त्यांनी लोकसभेत गोंधळ घातला होता. मात्र, ‘मेक इन इंडिया नाही’ तर ‘रेप इन इंडिया’, या वक्तव्यावर मी माफी मागणार नाही,” अशी ठाम भूमिका राहुल गांधी यांनी काल माध्यमांशी बोलताना घेतली.

मरेन पण माफी मागणार नाही

राहुल गांधी आज भारत बचाव रॅलीच्या भाषणा दरम्यान भाजपवर टीका केली. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, “माझे नाव राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे”, असे त्यांनी म्हटले. राहुल गांधी पुढे म्हटले की, मी सत्यासाठी कधीच माफी मागणार नाही, मी मरेन पण माफी मागणार नाही. मात्र, मीच काय, पण काँग्रेसमधील कोणीही माफी मागणार नाही.” “जर कोणाला माफी मागायची आहे. तर नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागायला हवी. मोदीबरोबर त्यांचे असिस्टंट अमित शहा यांनी देशाची माफी मागायला हवी. या देशाची शक्ती, अर्थव्यवस्था संपूर्ण जग पाहायचा. मात्र आज देशात काय होत आहे, असा सवाल राहुल गांधींनी विचारला,” मोदी सरकारला केला आहे.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जगनमोहन रेड्डी यांनी घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

News Desk

गुजरातच्या सचिवालय परिसरात बिबट्या शिरला

News Desk

राहुल गांधींना समजून घेण्यात शरद पवार कमी पडले !

News Desk