HW News Marathi
देश / विदेश

“काँग्रेसमध्ये डरपोक लोकांची गरज नाही; असतील तर पक्षातून बाहेर पडून RSS मध्ये जावं”- राहूल गांधी

नवी दिल्ली | राजकारणात कुरघोड्या, हेवेदावे, मतभेद यात काही नवल नाही .तसंच पक्षांतरही नवीन नाही. अनेक छोट्या-बड्या नेत्यांकडून आजवर पक्षांतरं झाली. तशी कॅांग्रेसमध्येही झाली. मात्र आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेस सोडणाऱ्या नेत्यांवर पहिल्यांदाच जाहीर भाष्य केले आहे. काँग्रेस सोडणारे नेते RSS ची माणसं आहेत. काँग्रेसला निडर नेत्यांची गरज आहे. कमजोर नेत्यांची नाही. संघाच्या विचारधारेवर विश्वास ठेवतील अशी माणसं काँग्रेसला नको. अशा नेत्यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवायला हवा अशा कडक शब्दात राहुल गांधींनी सुनावलं आहे. पक्षाच्या सोशल मीडिया यूनिटच्या बैठकीत ते बोलत होते.

देशात खूप असे नेते आहेत जे निडर आहेत, पण काँग्रेसमध्ये नाहीत

काँग्रेस पक्ष सध्या स्वबळाची भाषा करत आहेत. त्यामुळे महाविकासआघाडी मध्ये तिढा निर्माण होताना दिसत आहे. काँग्रेसमध्ये राहून ज्यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे अशांना राहुल गांधींनी स्पष्ट इशाराच दिला आहे. ‘देशात खूप असे नेते आहेत जे निडर आहेत, पण काँग्रेसमध्ये नाहीत. या नेत्यांना पक्षात आणलं पाहिजे. जे भाजपाला घाबरतात अशा काँग्रेसी नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे. आम्हाला अशा नेत्यांची गरज नाही. जे आरएसएसच्या विचारधारेवर विश्वास ठेवतात. आम्हाला निडर लोकांची गरज आहे.’असं स्पष्ट मत त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.

राहुल गांधींनी एक विडिओ ट्विट केला आहे. यात ते म्हणाले कि, ‘खूप सारे लोक आहेत जे घाबरत नाहीत. त्या सगळ्यांना काँग्रेसमध्ये आणावं. जे आमच्याकडे घाबरतात त्यांनी बाहेर पडावं. तुमची गरज नाही, RSS मध्ये जा, आम्हाला निडर लोकांची गरज आहे. ही आमची आयडियोलॉजी आहे.’ असं राहुल गांधी पुढे म्हणाले. राहुल गांधी यांच्या या विधानामागे ज्योतिरादित्य शिंदे आणि जितीन प्रसादसारखे नेते होते जे अलीकडेच भाजपात सहभागी झाले आहेत. काँग्रेसमध्ये राहून ज्यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे अशांना राहुल गांधींनी स्पष्ट इशाराच दिल्याचा अंदाज आहे. पक्षाच्या नेतृत्वाबद्दल काँग्रेसमध्ये जी २३ नेत्यांचा गट बनला होता त्यांच्यावरही राहुल गांधींनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब पाठोपाठ दिल्लीही ‘लॉकडाऊन’ 

swarit

बीडमध्ये मुंडे बहीण-भावात पुन्हा लागली श्रेय वादावर चढाओढ

News Desk

#DelhiAssemblyElections Live Updates : गांधी कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क

swarit