HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र

राज्यातील ‘हा‘ जिल्हासुद्धा होणार लाॅकडाऊन…

रायगड | राज्यातील अनेक जिल्ह्यांत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊन करण्यास सुरुवात झाली आहे.ठाणे ,कल्याण-डोंबिवली,नांदेड,नवी मुंबई, पुणे, पिंपरी -चिंचवड,सोलापूरनंतर आता रायगड जिल्ह्यामध्येसुद्धा १० दिवसांचा लाॅकडाऊन करण्यात येणार आहे.

रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. १५ जुलै ते २४ जुलै या कालावधीसाठी रायगड लॉकडाऊन करण्याची घोषणा अदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रायगड जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा साडेसात हजारांच्या पुढे गेल्याने १५ जुलैच्या मध्यरात्रीपासून २४ जुलैपर्यंत १० दिवसांचा लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणे, ठाणे, पनवेल पाठोपाठ आता रायगडमध्ये देखील लॉकडाऊन पुन्हा जारी केला आहे.

Related posts

आता धारावीतील प्रत्येक नागरिकाची होणार कोरोना टेस्ट

News Desk

‘नारायण राणे यांना अटक! हे नवे हिंदूत्त्व आणि नवा महाराष्ट्र’, देवेंद्र फडणवीसांचा आरोप

News Desk

भगवंतालाही फसवणारा अर्थसंकल्प ! भाजपच्या अध्यात्मिक आघाडीची टीका

News Desk