HW News Marathi
महाराष्ट्र

युतीसाठी मनसे उत्सुक, भाजप मात्र,…

नाशिक | पुढील वर्षाच्या सुरुवातीला नाशिकसह राज्यातील अठरा महापालिकांच्या निवडणुका होणार आहे. निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरु आहे. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला यश मिळाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील महाविकास आघाडी म्हणून मैदानात उतरल्यास भाजपला सत्तेपासून दुर ठेवता येईल. असा मतप्रवाह तयार झाला आहे.

भाजप बरोबर युती व्हावी अशी ईच्छा मनसेचे कार्यकर्ते व्यक्त करतं आहे

महापालिका निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस महाविकास आघाडी म्हणून निवडणुक लढण्याची तयारी करतं असताना दुसरीकडे भाजप व मनसेची युती चर्चा सुरु आहे. त्यातून नाशिक महापालिकेसाठी महाविकास आघाडीच्या बैठका घेण्याचे नियोजन सुरु आहे. सन २०१२ मध्ये महापालिकेत सत्तेत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवडणुक तयारी सुरु असल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार मैदानात उतरतं असतील तर भाजप बरोबर युती व्हावी अशी ईच्छा मनसेचे कार्यकर्ते व्यक्त करतं आहे. भाजप सोबत युती झाल्यास मनसेला आधार मिळून काही प्रमाणात सत्तेत वाटेकरी होता येईल असे मनसे कार्यकर्त्यांना वाटत आहे.

मनसैनिकांना भाजप बरोबर युती हवी असली तरी उत्तर भारतीय मतांवर परिणाम होण्याच्या भितीने भाजप मनसे सोबत युती करण्यास उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिका व पुढील वर्षात होणाया उत्तर प्रदेश निवडणुकीवर मनसे-भाजप युतीचा परिणाम होण्याची शक्यता असल्याने भाजपकडून युती बाबत अद्याप कुठलीचं भुमिका घेतली जाणार नसल्याची माहिती सुत्रांनी दिली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फेसबुक आणि ट्वीटरचा वापर लोकशाही हॅक करण्यासाठी! – सोनिया गांधी

Aprna

“देशाला कंडक्टरसारखा पंतप्रधान पाहिजे, जो सारखा म्हणेल आगे बढो, आगे बढो” – मुख्यमंत्री

News Desk

“पवार, ठाकरे आणि थोरात हे झारीतील शुक्राचार्य”, चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप!

News Desk