नवी मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा काल (९ मार्च) १४वा वर्धापन दिन मोठ्या दिमाखात पार पडला. आगामी काळातील नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेत यंदा पहिल्यांदाच मनसेचा वर्धापनदिन वाशी येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात पार पडला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेमुण दिलेल्या शॅडो कॅबिनेट मंत्रिमंडळाची या वेळेस घोषणा करण्यात आली.
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत पक्षाच्या मार्फत एक प्रतिरुप कॅबिनेट मंडळ उभे केले आहे. हे मंडळ सरकारच्या मंत्रीमंडळावर अंकुश ठेवण्याचे काम करणार आहे. महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला राज ठाकरेंनी प्रसार माध्यमांच्या मार्फत जे पदाधिकारी नसतील किंवा पक्षातही नसतील पण त्यांना यापैकी कोणत्याही मंडळात कोणाला काम करायचे असेल तर त्यांनी थेट मला भेटावे त्यांना त्या मंडळात समाविष्ट करण्यात येईल. तसेच, मला विचारल्याशिवाय परस्पर पत्रकार परिषद घ्यायची नाही, अशी ताकीदही त्यांनी त्यांच्या मंत्र्यांना दिल्याचे निदर्शनास आले.
राज ठाकरेंनी आपल्या भाषणात आरटीआयच्या मुद्द्यावरही भर दिला. ब्लॅकमेल करणारे आरटीआय टाकू नका असे आवाहन यावेळी राज ठाकरेंनी केले. कारण काही लोकं चांगल्या बाबींसाठी आरटीआय करतात पण देशातल्या अनेकांचा ब्लॅकमेल करणारे आरटीआय टाकणे हा उद्योगच आहे. हे मंत्रीमंडळ त्यासाठी उभारले नसून महाराष्ट्राची व्याप्ती पाहता एका माणसाकडून खाती पाहणे शक्य नसल्याने इतकी माणसे नेमली आहेत. तर अजूनही कोणाला या खात्यांत सहभागी व्हायचे असल्यास त्याचा समावेश आम्ही नक्की करू असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीं सांगितले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.