HW News Marathi
महाराष्ट्र

“सुखी माणसाचा सदरा या कार्यक्रमातून आनंद सापडू दे”, राज ठाकरेंच्या केदार शिंदे आणि भरत जाधवांना शुभेच्छा!

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेहमीच कलाकारांच्या पाठीशी उभे असतात. याचीच आणखी एक प्रचिती आली आहे. राज ठाकरे यांनी दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या नव्या मालिकेवरुन त्यांचे आणि अभिनेता भरत जाधव यांचे भरभरुन कौतुक केले आहे. राज ठाकरे यांचे रंगभूमीवरील प्रेम सर्वश्रुत आहे. ते नेहमीच मराठी सिनेमा आणि कलाकरांच्या अभिनयाला दाद देत असतात. आता त्यांनी भरत जाधव आणि केदार शिंदे यांची नव्या मालिका ‘सुखी माणसाचा सदरा’चा प्रोमो शेअर करत त्यांचं कौतुक केले आहे. राज ठाकरेंनी त्यांच्या ट्विटर हँडलवर ‘सुखी माणसाचा सदरा’ या मालिकेचा प्रोमो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

“कोरोनाचं सावट आणि त्यामुळे आलेलं आर्थिक संकट ह्यामुळे सगळ्यांचा आनंदच कुठेतरी हरवला आहे. केदार शिंदेच्या ‘सुखी माणसाचा सदरा’ ह्या लॉकडाऊननंतरच्या पहिल्या नव्या दूरदर्शन मालिकेमधून ते सुख, तो आनंद सापडेल किंवा सापडू दे असं मनापासून वाटतं”, असं ट्वीट राज ठाकरेंनी केलं.

“भरत जाधवला बऱ्याच वर्षांनी पुन्हा छोट्या पडद्यावर आलेलं पाहून छान वाटलं. ह्या सगळ्या अस्वस्थ, अनिश्चिततेच्या वातावरणात तुमचा ‘सुखी माणसाचा सदरा’ रोज किमान अर्धा तास तरी मराठी मनांना ह्या अनिश्चिततेतुन ब्रेक देईल आणि लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणेल”, असं म्हणत त्यांनी भरत जाधवचं कौतुक केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवारांच्या बहिणींच्या नावे बेनामी संपत्ती, जरंडेश्वरमध्ये घोटाळा, सोमय्यांचा आरोप!

News Desk

‘मी आता संजय राऊतांवर पुस्तकचं लिहिणार!’ चंद्रकांत पाटलांकडुन खिल्ली

Arati More

तब्येत खराब असल्यानेच पंकजा मुंडे गैरहजर कोणीही वेगळा अर्थ काढू नये – प्रितम मुंडे

News Desk