HW News Marathi
महाराष्ट्र

ईव्हीएमविरोधात राज ठाकरे आज घेणार पत्रकार परिषद

मुंबई । विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाला गळती लागलेली आहे. कोणता आमदार कधी पक्षांतर करेल? काही सांगता येत नाही. तर वंचित बहुजन आघाडी स्वबळाची तयारी करत आहे. या सर्व घडामोडी सुरू असताना मात्र दुसरी बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादीसह राज्यातील विरोधी पक्ष ईव्हीएम मशीनच्या मुद्द्यावर एकत्र येताना दिसत आहेत. ईव्हीएमला वेगवेगळ्या माध्यमातून विरोध होत आहे. याबाबत नुकताच राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पतील, अजित पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आहे. ईव्हीएम मशीनच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज (२ ऑगस्ट) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

या पत्रकार परिषदेला राज ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शेकापचे जयंत पाटील हे नेते उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर व्हावी, यासाठी हे पक्ष एकत्र येत आहेत. या विरोधीपक्षांनी एकत्र येण्याचे निमित्त ईव्हीएम असले तरी विधानसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र यायला सुरुवात झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एसटी बस-मालवाहू कंटेनरचा भीषण अपघात, १५ जणांचा मृत्यू

News Desk

डिसेंबर उजाडेपर्यंत महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वात सरकार स्थानापन्न होईल !

News Desk

“…म्हणूनच तुमची इतकी मस्ती आणि चरबी वाढली”, संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र

Aprna