HW News Marathi
महाराष्ट्र

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचं १००व्या वर्षात पदार्पण, राज ठाकरेंकडून खास शुभेच्छा!

पुणे | शिवशाहीर बाळासाहेब पुरंदरेंनी आज(२९ जुलै) १००व्या वर्षात पदार्पण केलं आहे. त्यांच्या वाढदिवसासाठी खास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरेंना भेट त्यांच्या पुण्याच्या घरी भेट दिली आहे. राज ठाकरे यांनी सर्वप्रथम बाबासाहेब पुरंदरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचा सन्मान केला. तसंच त्यांच्या पायावर डोकं ठेऊन त्यांचा आशीर्वादही घेतला आहे.

राज ठाकरे झाले नतमस्तक

बाबासाहेब पुरंदरे यांचा वाढदिवसासाठी पुण्याच्या कात्रजमध्ये एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. राज ठाकरे यांनी आपली खास उपस्थिती दाखवली आहे आणि त्यांच्या पायावर नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद देखील घेतले आहेत. राज ठाकरे यांनी सर्वप्रथम शिवशाहीरांचा सन्मान केला. गुलाबपुष्प आणि पगडी घालून शिवशाहीरांप्रति त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसंच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पायावर डोकं ठेऊन त्यांचे आशीर्वादही घेतले आहेत.

राज ठाकरे यांनी मास्क लावलेला होता

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि राज ठाकरे यांच्यातला जिव्हाळा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. राज ठाकरे ज्या ज्या वेळी पुणे दौऱ्यावर असतात त्यावेळी ते हमखास पुरंदरे यांची भेट घेत असतात. 2019 मध्ये अमित ठाकरेंच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी खुद्द राज ठाकरे हे पुणे येथील निवासस्थानी आले होते. त्यानंतर बाळासाहेब पुरंदरेंनी देखील लग्नाला उपस्थिती लावत अमित आणि मितालीला आशीर्वाद दिले होते.या भेटीदरम्यान, राज ठाकरे यांनी मास्क लावलेला होता. राज यांच्यासोबत मनसेचे पदाधिकारी आणि इतर कार्यकर्ते होते. त्यामुळे कोरोनाची परिस्थितीत पाहता खबरदारी म्हणून सर्वांनी मास्क लावूनच बाळासाहेबांच्या घरी एंट्री केली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जर काँग्रेसचे विचार स्वीकारुन खडसे आमच्यासोबत येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करु

News Desk

बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प आहेत!

News Desk

अण्णा हजारेंचा मोदी सरकाराला अखेरचा इशारा

News Desk