HW News Marathi
महाराष्ट्र

रेमडेसिवीरसाठी भाजप मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे, राजेंद्र शिंगणे यांचा आरोप

मुंबई | ब्रुक फार्मा कंपनीकडील रेमडेसिवीर खरेदी करण्याच्या प्रकरणावरून राज्यात मोठं राजकारण झालं. मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकांची चौकशी केल्यानंतर राज्याच्या अन्न व औषध खात्याच्या मंत्र्यांच्या सहमतीनेच रेमडेसिवीरची खरेदी केली जाणार होती, असा दावा भाजपने केला होता. भाजपकडून करण्यात आलेला दावा राज्याचे अन्न व औषध मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी फेटाळून लावला आहे. कोणत्याही पक्षाला रेमडेसिवीर विकण्याचा अधिकार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवू लागला होता. त्यामुळे सगळीकडे रुग्णांच्या नातेवाईकांची रेमडेसिवीरची शोधाशोध सुरू होती. त्यातच ब्रुक फार्मा कंपनीने रेमडेसिवीरचा साठा केल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली आणि ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावून घेतलं होतं.

अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या परवानगीनेच रेमडेसिवीरची खरेदी केली जाणार होती, असा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. त्या आरोपाला आता राजेंद्र शिंगणे यांनी उत्तर दिलं आहे. “कोणत्याही पक्षाला रेमडेसिवीर वाटण्याचा अधिकार नाही. भाजपाच्या काही लोकांनी त्यांच्या पुरवठादारांकडून रेमडेसिवीर खरेदी करण्यासाठी संपर्क केला होता. ते लोक मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. रेमडेसिवीरचा काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल,” असं शिंगणे यांनी म्हटलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शाहु महाराज जयंती निमित्त आयोजित दिंडीला उत्तम प्रतिसाद

News Desk

नागपूरमध्ये पहिल्या फेरीत काँग्रेसचे अभिजित वंजारी यांची आघाडी, तर संदीप जोशी पिछाडीवर

News Desk

महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणात – मुख्यमंत्री

News Desk