HW News Marathi
महाराष्ट्र

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक, ती अजातशत्रु होती. एका शब्दानेही तिने कुणाला दुखावलं नाही – राजेश टोपे

मुंबई | कोरोनाच्या संकट काळात राज्यातील स्थिती एकीकडे आणि आईची तब्येत या सर्व बाबी अगदी नीट सांभाळणारे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदा टोपे (७४) यांचे काल (१ ऑगस्ट) निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून प्रदीर्घ आजाराने त्या त्रस्त होत्या. त्यांच्यावर मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु होते.

“ती अजातशत्रु होती. एका शब्दानेही तिने कुणाला दुखावलं नाही. सर्वांना प्रेम दिले. माझ्या वडिलांच्या सोबत ती सावली सारखी राहिली. चार वर्षांपूर्वी वडिल गेल्यानंतर ती आधार होती. दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आर्शिवाद दिले. तो आशिर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील,” अशी भावना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली.

राजेश टोपे यांच्या आईंवर गेल्या महिनाभरापासून बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु होते. मार्चमध्येही त्या महिनाभर ॲडमीट होत्या. बरे झाल्यानंतर त्या दोन महिने घरीच होत्या. मात्र पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोनामुळे जिल्ह्यांचे आढावा दौरे, सततच्या बैठका यात वेळात वेळ काढून आरोग्यमंत्री टोपे आईला भेटायला रुग्णालयात जायचे. रोज सकाळी आईला भेटून दिवसाची सुरुवात ते करायचे.

राजेश टोपे यांच्या आईच्या स्मृतीस अनेक नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार

यशोमती ठाकूर,

 

सुप्रिया सुळे

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा मला आनंदच खासदार सुप्रिया सुळेचं वक्तव्य!

News Desk

“…तुमच्या मागे ईडी, सीबीआयची चौकशी लावू”, ठाकरे सरकारच्या नेत्याला धमकी

News Desk

गुलाब चक्रीवादळाचे ठाण्यात आगमन!

News Desk