HW Marathi
देश / विदेश मंत्रिमंडळ महाराष्ट्र मुंबई राजकारण शिक्षण

परीक्षेशी आरोग्य विभागाचा संबंध नाही, मात्र तरीही….

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट- क आणि गट- ड साठी होणाऱ्या परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. हि परीक्षा देण्यासाठी अनेक विद्यार्थी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून परीक्षा केंद्रांवर पोहोचले होते. मात्र परीक्षा अचानक रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे.

परीक्षा घेण्यासाठी संबंधित कंपनीने अमसर्थता दर्शवल्याने त्या पुढे ढकलण्याशिवाय पर्याय नव्हता

मात्र आता या सगळ्या गोंधळावर खुद्द आरोग्यमंत्री राजेश यांनी स्पष्टीकरण दिले आहे. टोपे म्हणाले, आरोग्य विभागाच्या गट क आणि ड प्रवर्गातील परीक्षा घेण्यासाठी संबंधित कंपनीने अमसर्थता दर्शवल्याने त्या पुढे ढकलण्याशिवाय पर्याय नव्हता. कंपनीने आणखी ८ दिवसांचा कालावधी मागितला होता. त्यामुळे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी रात्री उशिरा चर्चा करून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मात्र परीक्षा १०० टक्के होणारचं आहे, परीक्षा रद्द झाली नसून ती केवळ पुढे ढकलण्यात आल्याचं देखील आरोग्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.सोबतच विद्यार्थ्यांना जो मानसिक त्रास झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केली आहे. वास्तविक परीक्षांचा थेट संबंध आरोग्य विभागाशी नाही. माहिती व तंत्रज्ञान विभागाचा हा विषय आहे, कोणत्या कंपनीची निवड करायची हे तेच ठरवतात. पण, आमच्या विभागातील नोकरीचा विषय असल्याने उद्या बैठक घेऊन आम्ही परीक्षेची तारीख निश्चित करू, असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

Related posts

राहुल बाबा तुम्हाला आकडेवारी येत नाही ?

News Desk

उद्धव ठाकरे देशाचं नेतृत्व करणार?, राऊतांच्या विधानावर शरद पवार म्हणतात..

News Desk

राम मंदिर हा कोणत्याही एकाच पक्षाचा पेटंट मुद्दा नाही !

News Desk