HW News Marathi
महाराष्ट्र

दूध आंदोलन म्हणजे पुतण्या- मावशीचं प्रेम आहे ,राजू शेट्टी यांचा भाजपला टोला

कोल्हापूर | राज्यभरात दूध उत्पादक संघर्ष समिती आणि भाजपसह विरोधी पक्षाने दूध दरवाढीसाठी आंदोलन पुकारले आहे. यावरून राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर, ‘अलिकडे फडणवीसांचे सगळेच मुहूर्त चुकत आहेत. दूध आंदोलनासाठी त्यांनी काढलेला मुहूर्तही चुकीचा आहे. शासकीय सुट्टीच्या दिवशी आंदोलनाकडे कोण लक्ष देणार? असा प्रश्न उपस्थित करत टोला लगावला आहे. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी देखील भाजपच्या दूध आंदोलनावर टीका केली आहे.

“आज भाजप आणि विरोधीपक्ष केवळ राज्य सरकारविरोधात आंदोलन करत असतील तर हे पुतणा-मावशीचं प्रेम आहे. कारण ठोस उपाययोजना ही केंद्र सरकारनेच केली पाहिजे. आयात थांबवली पाहिजे. निर्यातील अनुदान द्यायला हवे. तसेच जीएसटी मागे घेतला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने अभूतपूर्व संकटात सापडलेला दूध उत्पादक यातून बाहेर पडेल,” असेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हे सरकार आपल्याच आमदारांना घाबरत असल्याचं दिसत आहे- देवेंद्र फडणवीस

News Desk

ओबीसी आरक्षण अडचणीत आणि मंत्री परदेशात; पडळकरांची महाविकासआघाडी सरकारवर टीका

Aprna

“चौकशीची खूपच घाई असेल तर…”,समन्सला रश्मी शुक्लांचं उत्तर

News Desk