HW News Marathi
महाराष्ट्र

थातूरमातूर बोलून विषय टोलवू नका, राम कदमांचे राऊतांना आव्हान 

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या आरोपामुळे संजय राऊत चांगलेच संतापले आहेत. त्यांनी माध्यमांशी संवाद साधत, किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला चढवला आहे. यानंतर आता भाजप नेते राम कदम यांनी, या वादात उडी घेतली आहे. किरीट सोमय्या यांनी दस्तऐवज दाखवत आरोप केला आहे. यामुळे, शिवसेना नेते संजय राऊतांनी त्रागा करू नये. तसेच थातूरमातूर बोलून विषय टोलवू नका. सोमय्यांच्या आरोपांना उत्तरं द्या, असे आव्हान राम कदम यांनी राऊतांना दिले आहे.

“संजय राऊतांबद्दल मला व्यक्तीशः अत्यंत आदर आहे. मात्र, त्यांनी माध्यमांशी बोलताना सोमय्यांच्या एका तरी आरोपाचे उत्तर दिले का?, असा सवालही कदम यांनी केला आहे. कदम म्हणले, संजय राऊत त्रागा का करून घेत आहेत माहीत नाही. सोमय्या यांनी कागदपत्रांच्या आधारे आरोप केला आहे. राऊतांनी सोमय्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला हवीत. थातूरमातूर उत्तरं देऊ नयेत. एवढेच नाही, तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. ते मुख्यमंत्री नसते, तर कुणी हा प्रश्नही उपस्थित केला नसता. यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जमिनीचे 21 व्यवहार केलेत की नाही? हे राऊतांनी सांगावे”, असे कदम यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आशिष शेलारांनी घेतली आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट

News Desk

पूरग्रस्त विद्यार्थ्यांची जेईई, नीट परीक्षा पुढे ढकलता येणार नाही

News Desk

राज्यपालांनी अर्णब गोस्वामींची काळजी करु नये, अशा छोट्या-मोठ्या गोष्टीत लक्ष न घालण्याचा भूजबळांचा राज्यपालांना सल्ला

News Desk