HW News Marathi
महाराष्ट्र

“नारायण राणे डगमणारे नेते नाहीत, ते खंबीर”, रामदास आठवलेंचा नारायण राणेंना जाहीर पाठिंबा

मुंबई। महाराष्ट्रात सध्या अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. शिवसेना आणि केंद्रोय मंत्री नारायण राणे यांच्यात सुरु असेलेल्या वादाचे परिणाम राजकीय वर्तुळात देखील दिसू लागले आहेत. याचेच पडसाद आता दिसू लागले आहेत. भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात यवतमाळ आणि नाशिक मध्ये गुन्हा नोंदवला आहे. तर दुसरीकडे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नारायण राणे यांची त्यांच्या जुहू इथल्या घरी जात भेट घेतली. तसंच आठवले यांनी नारायण राणेंना रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा दिला आहे. राणेंवर झालेली कारवाई ही अन्यायकारक आणि चुकीची असल्याचा आरोपही आठवले यांनी केला आहे.

नारायण राणे हे प्रदीर्घ अनुभव घेतलेले नेते

रामदास आठवले यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचं मत व्यक्त केलं आहे. “नारायण राणे हे प्रदीर्घ अनुभव घेतलेले नेते असून त्यांच्यावर झालेली पोलिसी कारवाई अन्यायकारक चुकीची आहे. अशा प्रसंगांना पुरून उरणारे निर्भीड नेते नारायण राणे असून त्यांच्या या प्रसंगात रिपब्लिकन पक्ष नारायण राणे यांच्या पाठीशी असल्याचे सांगत ना रामदास आठवले यांनी नारायण राणे यांना पाठिंबा दिला. यावेळी रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, एम एस नंदा, प्रकाश जाधव, आदी पदाधिकारी उपस्थित होते. नारायण राणे अशा प्रसंगांमुळे डगमणारे नेते नाहीत. ते खंबीर आहेत. निडर अहेत. त्यांनी दिल्लीत येऊन झालेल्या प्रकाराची गृहमंत्री अमित शहांना माहिती द्यावी. राणे यांच्यावर झालेली कारवाई अत्यंत चुकीची आहे”, असं आठवले यावेळी म्हणाले आहेत.

अनेक शिवसेना नेत्यांनी आणि शिवसैनिकांनी असं व्यक्तव्य केलं

यापूर्वी अनेक शिवसेना नेत्यांनी आणि शिवसैनिकांनी असं व्यक्तव्य केलं आहे. त्यांच्यावर कुठे गुन्हे दाखल झाले, पोलिसांनी पकडलं दाखवा, असं आव्हानच रामदास आठवले यांनी महाविकास आघाडी सरकारला दिलंय. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना भाषणातून उत्तर द्यायला हवं होतं. पण पोलिसांकडून कारवाई करुन घेतली ती चुकीची आहे. पोलिसांची यात चूक नाही. पोलिसांच्या माध्यमातून सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई चुकीची आहे, त्यांनी काही गुन्हा केलेला नाही, अशा शब्दात रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तुमचा पराभव बगलबच्च्यांच्या उद्योगांमुळे झाला”, शिवेंद्रराजेंची शशिकांत शिंदेंवर जहरी टीका!

News Desk

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर अनुपस्थित किंवा शून्य गुण 

News Desk

“बरळत ‘रा(ह)णे’ तुमचं काम आहे, जीभ ताब्यात ठेवा शिवसैनिक ठाम आहे”

News Desk