HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

सत्ताधारी शिवसेनेची ही धमकी योग्य नाही, आम्ही कंगनाला संरक्षण देऊ !

मुंबई । बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबई आणि मुंबई पोलिसांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर तिच्यावर सर्वच स्तरांतून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. मात्र, आता आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी कंगना राणावतला समर्थन दिले आहे. “लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने अशी धमकी देणे योग्य नाही”, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

“अभिनेत्री कंगना राणावतलाही तिचे मत मांडण्याचा आणि मुंबईत राहण्याचा अधिकार आहे. सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने धमकी देणे योग्य नाही. कंगना राणावतला आरपीआय संरक्षण देईल”, असे आश्वासन देत रामदास आठवले यांनी शिवसेनेच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आता शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते ? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

कंगनाचे आव्हान

“अनेक जण मला मुंबईला परत न येण्याची धमकी देत आहेत. म्हणूनच येत्या आठवड्यात ९ सप्टेंबरला मी मुंबईला येण्याचा निर्णय घेतला आहे. मी मुंबई विमानतळावर किती वाजता येईल याची वेळ लवकरच सांगेन. कोणाच्या बापात हिंमत असेल तर मला अडवून दाखवा”, अशा शब्दांत कंगनाने आव्हान दिले आहे.

संजय राऊत आक्रमक

“मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे. ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा. शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही. प्रॉमिस. जय हिंद, जय महाराष्ट्र”, असे ट्विट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Related posts

शौचालयासाठी कंत्राटदारांना मुदतवाढ, दोन वर्षांत दोन हजार शौचालये बांधली जाणार ?

News Desk

भाजपच्या राज्य कार्यकारिणीकडून एकनाथ खडसेंना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी

News Desk

‘कोव्हिड योध्यांची’ राज ठाकरेंकडे मदतीची मागणी

News Desk