HW News Marathi
महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्राच्या मदतीसाठी रामराजे नाईक-निंबाळकर सरसावले!

सातारा | कोरोनाने राज्यातील आरोग्य व्यवस्था हळूहळू कमकुवत बनत चालली आहे. ऑक्सिजनची कमतरता, बेड्सची कमतरता, औषधांचा तुटवडा या सगळ्या अडचणींना सरकार सामना देत आहेत. दरम्यान, या सगळ्या अडचणींचा सामना करण्यासाठी सरकारच्या मदतीला नेतेमंडळीही धावून आली आहेत.

गेल्या काही दिवसापासून बंद पडलेल्या परंतु विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पुढाकाराने लोणंद औद्योगिक वसाहतीमधील सोना अलॉईज कंपनीत दररोज तयार होणार असून सुमारे दीड ते दोन हजार सिलेंडर ऑक्सिजन पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांना संजीवनी नक्कीच ठरणार आहे.

गेली आठ दहा वर्षे सोना कंपनी कामगारांच्या संपामुळे व आर्थिक मंदीमुळे बंद पडली होती त्यामुळे बंद पडलेली सोना कंपनीच आता शेकडो रुग्णांसाठी ऑक्सिजनची निर्मीती करणार आहे. सोना कंपनीतून रोज १८०० सिलेंडर ऑक्सिजन तयार केला जाऊन रुग्णांपर्यत पोहचवला जाणार आहे.

दरम्यान, काही वर्ष सोना कंपनी चांगली चालल्यानंतर राजकीय हस्तक्षेपामुळे कामगार युनियनचे लोकांना माहित झाली. त्याचा परिणाम म्हणजे कंपनी बंद पडली. रामराजेंच्या माध्यमातून हजारो घरात रोजची चुल बंदी पडली. कामगारांच्या संपा बरोबरच जागतिक आर्थिक मंदीमुळे कंपनी २ वर्षांपासून बंद पडली होती.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना कमी पडत असणारा ऑक्सिजन सोना कंपनीत तयार होऊ शकतो याची माहिती रामराजे यांना होती. त्यामुळे पुढाकार घेत ऑक्सिजनची निर्मिती करण्याचा प्रस्ताव तयार केला गेला आणी सोना कंपनीत दररोज सुमारे दीड ते दोन हजार सिलेंडर ऑक्सिजन तयार करण्यास सुरुवात झाली. या सिलेंडरचा पुरवठा पश्चिम महाराष्ट्रात केला जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“या सरकारची हंडी फोडण्याची वेळ आलीये”, दहीहंडी निर्णयावरून अतुल भातखळकर आक्रमक

News Desk

अखेर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला

News Desk

राडारोडा काढण्याची व नालेसफाईची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

News Desk