HW News Marathi
महाराष्ट्र

पुन्हा एकदा राणे भोसले वाद पोस्टर वर, भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल

मुंबई शिवसेना प्रवक्ते अरविंद भोसले यांनी नारायण राणे यांच्या विरुद्ध भाष्य करणारे बॅनर वरळी नाक्यावरील शिवसेना शाखेच्या परिसरात लावल्यामुळे भोसलेंविरोधात वरळी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी या प्रकरणी तक्रार केली होती. अरविंद भोसले आणि नारायण राणे यांचे राजकिय वितुष्ट कुणाला माहीत नसेल तरच नवल. नारायण राणे हरले तरच मी चप्पल घालेन असे म्हणत 9 वर्षे अनवाणी फिरणारे शिवसेनेचे अरविंद भोसले सर्व वरळीकरांना परिचयाचे व्यक्तिमत्त्व आहेत. गेल्या काही दिवसात नारायण राणे काँग्रेस सोडून भाजपात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र यावर शिवसेनेकडून कोणतेही भाष्य केले गेले नव्हते परंतु या पोस्टर मुळे राणे भाजप पक्ष प्रवेश या प्रकरणात शिवसेनेने उडी मारली असल्याचे चित्र सध्या वरळीत पहायला मिळत आहे.

या पोस्टर च्या माध्यमातून अरविंद भोसले यांनी नारायण राणे यांच्यावर अत्यंत घाणेरड्या शब्दात टीका करण्यात आली होती. भावी काळातील नारायण राणेंच्या भाजप प्रवेशावरुन शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्याचे यातून दिसून येत आहे.

दसरा दिवाळी अंक 2017 संपादक सदैव प्रामाणिक असणारा कोकणी माणूस असे लिहून राणे यांच्यावर अत्यंत घाणेरड्या शब्दात भोसले यांनी बॅनर लावून टीका केली. तसेच दसरा दिपावलीच्या शुभेच्छा देऊन शुभचिंतक अरविंद भोसले, शिवसेना प्रवक्ता असे आवर्जून बॅनर वर लिहिण्यात आले होते.

भोसले यांनी राणेंवर पोस्टरच्या माध्यमातून केलेली टीका सध्या वरळी कर तसेच सोशल मीडियामुळे चांगलाच चर्चेचा विषय ठरली आहे. राणेंसोबत भोसले यांनी भाजपला देखील लक्ष केले असल्यामुळे भावी काळात हा वाद नक्की कोणतं टोक गाठणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. परंतु सध्या वरळीत शिवसेना भाजपा युद्ध नको म्हणून महापालिका जी दक्षिण विभागाच्या वतीने हे पोस्टर उतरविण्यात आले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाल्यांची पवारांची माहिती

News Desk

लक्ष्मी विलास बँकेवर RBI चे निर्बंध, केवळ २५ हजार रुपयेच काढता येणार

News Desk

“मग कल्याण म्हणाला असता, दादा तुम्हीही पहाटे शपथविधीला होता”

News Desk