HW News Marathi
महाराष्ट्र

शेजारी-शेजारी खुर्ची, तरीही राणे-ठाकरेंनी एकमेकांकडे पाहिलं नाही!

सिंधुदुर्ग। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातला राग हा चिपी विमानतळावरही दिसला, विमानतळाच्या कोनशिलेच्या अनावरप्रसंगी उद्धव ठाकरे, नारायण राणे, अजित पवार, बाळासाहेब थोरात आणि इतरही मंत्री उपस्थित होते.यावेळी नारायण राणे आणि अजित पवार यांनी एकाच वेळी एकमेकांना नमस्कार घातला. बाळासाहेब थोरात आणि राणेंनीही एकमेकांना नमस्कार घातला. पण ना उद्धव ठाकरेंनी राणेंकडे बघितलं ना राणेंनी उद्धव ठाकरेंकडे पाहिलं. एकंदरितच तेरे भी चुप-मेरे भी चुप असा प्रसंग उपस्थितांनी अनुभवला.

मुख्यमंत्र्यांचं विमान चिपीवर लँड झालं

दुपारी साडेबाराच्या आसपास राणे आणि मुख्यमंत्र्यांचं विमान चिपीवर लँड झालं. पालकमंत्री उदय सामंत, स्थानिक नेते आणि मंत्री, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांनी मुख्यमंत्री आणि राणेंचं स्वागत केलं.केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे दिल्लीहून दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित. खासदार विनायक राऊत हे सूत्रसंचालन करीत असून त्यांनी सर्वांचे स्वागत केले.

पण मनातला दुरावा यावेळीही तसाच राहिला

उद्धव ठाकरे आणि नारायण राणे जवळपास 16 वर्षांनी एकाच मंचावर येत आहेत. दरम्यानच्या काळात त्यांच्यातलं राजकीय वैर संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवलं. पण आज कोकणच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वकांक्षी असलेल्या चिपी विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी राणे-ठाकरे आपल्यातल्या वाद बाजूला ठेऊन एकमेकांना बोलतील, चर्चा करतील. कमीत कमी एकमेकांना पाहून नमस्कार तरी करतील, अशी शक्यता होती. पण तसं काहीच झालं नाही.कार्यक्रमाला कोणतंही गालबोट लागणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं आम्ही कोकणात स्वागत करु, अशी भूमिका नारायण राणे यांनी मांडली होती. त्यामुळे आज राणे मुख्यमंत्र्यांचं स्वागत करतील, अशी शक्यता होती. पण मनातला दुरावा यावेळीही तसाच राहिला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२३ एप्रिलपासून जिल्ह्यात कापूस खरेदी सुरू; हरभरा खरेदीसाठी २ दिवसात ग्रेडर नेमण्याचे आदेश

News Desk

दिवाळीआधी शाळा सुरू होणार नाही – अजित पवार

News Desk

सतीश उकेंना घेऊन ईडीचे पथक मुंबईत दाखल

News Desk