HW News Marathi
महाराष्ट्र

राणेंचं मनस्वास्थ बिघडलंय संजय राऊतांचे हल्ले सुरूच!

नाशिक। शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला आहे. राणेंचं मनस्वास्थ बिघडलं आहे. त्यांनी विपश्यना करावी, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे्य यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन राणेंना लक्ष्य केलं. नारायण राणे केंद्राचे मंत्री आहेत. त्यांची प्रकृती बरी नसते. अटकेचा प्रसंग आला तेव्हा ते आजारी पडतात. त्यांचं मनस्वस्थ बिघडलं आहे. त्यांनी विपश्यना करावी. त्यांच्या मुलाने त्यांना त्रास देऊ नये, असा चिमटा राऊत यांनी काढला. उद्यापासून लाखो शिवसैनिक राणेंच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करणार आहेत. भाजपने देखील प्रार्थना करावी, असा टोलाही त्यांनी लगावला.

भाजपच आणि आमचं नातं 25 वर्षाचं आहे

एकमेकांच्या कार्यालयावर हल्ला करणे उद्धव ठाकरे आणि आम्हाला आवडत नाही. भाजपच आणि आमचं नातं 25 वर्षाचं आहे. मात्र एका व्यक्तीमुळे हे नात बिघडलं. राणे जे बोलताय ते फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार बोलू शकत नाही म्हणून त्यांनी राणेंना बोलायला पुढे केलं, असा आरोपही त्यांनी केला.कोकणात तुमचा कितीदा पराभव झालंय हे बघावं. सेना व्यक्तीमुळे नाही तर बाळासाहेबांच्या विचारामुळे आहे, असं सांगतानाच यात्रा हा पवित्र शब्द आहे. जे पावित्र्य जपून यात्रा काढता त्यांना त्याचा फायदा होतो. शिवसेना ही यात्रा आहे, जी बाळासाहेबाणी सूरु केली आहे, असं राऊत म्हणाले.

त्या दोघांना हजर राहण्याच्या सूचना

यावेळी त्यांनी पोलीस आयुक्तांच्या भेटीवरही भाष्य केलं. नाशिकचे पोलीस आयुक्तांना मी आज ओळखत नाही. आमचं कौटुंबिक नात आहे. ते प्रामाणिक आणि कर्तबगार अधिकारी आहेत. अशा अधिकाऱ्यांना भेटणं मला आवडतं, असं त्यांनी सांगितलं. मी देखील खासदार आहे. मला कायद्याचा अभ्यास आहे. मी कायदा तोडत नाही. मी त्या दोघांना पोलिसांसमोर हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मुंबई पोलीस’ आपला ब्रँड बाजारात आणण्याच्या तयारीत, जाणून घ्या काय काय वस्तू असणार

Aprna

‘आरे’साठी सर्वंकष विकास आराखडा लवकरच तयार करण्यात येईल! – राधाकृष्ण विखे पाटील

Aprna

“मुलाच्या मतदार संघात ‘पावरी’ होत आहे आणि आमचे मुख्यमंत्री”

News Desk