HW News Marathi
देश / विदेश

साताऱ्याचे रणजित मोरे यांची मेघालय उच्च न्यायालयात बदली..

मुंबई | मुंबई उच्च न्यायालयातील सेवाज्येष्ठतेनुसार मुख्य न्यायमूर्तीनंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे न्यायमूर्ती रणजित मोरे यांची आता मुंबई उच्च न्यायालयातुन मेघालय उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे. रणजित मोरे हे सातारा जिल्ह्यातील निमसोड गावचे सुपुत्र आहेत. त्यांच्या बदलीबाबतची अधिसुचना अधिसूचना बुधवारी रात्री उशिरा काढण्यात आली. दुसरीकडे मुख्य न्यायमूर्तीची निवृत्ती, सेवाज्येष्ठतेत वरिष्ठ असलेल्या न्यायमूर्तीचा राजीनामा आणि एका न्यायमूर्तीची बदली या पार्श्वभूमीवर अ‍ॅड्. अभय अहुजा यांची मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

न्यायमूर्ती मोरे यांची मेघालय न्यायालयात बदली करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने (Collegium ) सरकारकडे केली आहे. न्यायमूर्ती मोरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने गेल्याच वर्षी मराठा समाजाला सरकारी नोकरी आणि शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय योग्य ठरवला होता. याशिवाय रणजित मोरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानेच ‘आदर्श’ सोसायटी बेकायदा ठरवत ती पाडण्याचे आदेश दिले होते. तसेच पंजाब अ‍ॅण्ड नॅशनल बँकेतील (पीएनबी) गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी आणि ‘हौसिंग डेव्हल्पमेंट अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’चे (एचडीआयएल) राकेश आणि सारंग वाधवान पितापुत्रांच्या व कंपनीच्या मालकीच्या मालमत्तेच्या लिलावासाठी न्यायालयीन समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. या कामी वाधवान पितापुत्रांना तपास यंत्रणांना सहकार्य करता यावे यासाठी त्यांना कारागृहाऐवजी त्यांच्या घरातच ‘नजरकैद’ करण्याचे आदेशही न्यायमूर्ती मोरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुलवामामध्ये सुरक्षा दलाकडून ३ दहशतवादी ठार, १ जवान शहीद

News Desk

महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर

Aprna

अरुणाचल प्रदेशातील कामेंग सेक्टरमध्ये हिमस्खलनात अडकलेल्या ७ भारतीय जवानांचा मृत्यू

Aprna