HW News Marathi
देश / विदेश

“अमर, अकबर, अँथनी अशी यांची तीन तोंडं…”, रावसाहेब दानवेंची राज्यसरकारवार टीका

नवी दिल्ली | केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे योनीपुन्हा एकदा राज्यसरकारवार निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात भाजपासोबत काडीमोड घेऊन शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत तीन पक्षांचं सरकार स्थापन केलं. मात्र, सुरुवातीपासूनच राज्यात भाजपाकडून सरकार कधी पडेल याचे मुहूर्त दिले जात आहेत. तसेच, आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावू, सरकार आपोआपच पडेल, असं देखील भाजपाकडून सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. तसेच, पुन्हा एकदा राज्यातील सरकार स्वत:हूनच पडेल, अशी ‘भविष्यवाणी’ रावसाहेब दानवे यांनी वर्तवली आहे.

यांच्यात ताळमेळ नाहीये

राज्यसरकारवर टोला लगावत त्यांनी टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी बोलताना रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. “हे तीन पक्षांचं सरकार आहे. यांच्यात ताळमेळ नाहीये. हे एकमेकांच्या पायात पाय घालून पडणारं सरकार आहे. अमर अकबर अँथनी अशी यांची तीन दिशेला तीन तोंडं आहेत. हे सरकार आपापसांतच भांडून पडेल. आम्हाला हे सरकार पाडण्यासाठी काही करण्याची गरजच नाहीये”, असं दानवे म्हणाले आहेत.

त्यांच्या चांगल्या कामांना पाठिंबा देऊ

“सिनेमा कितीही खराब असला आणि एकदा तिकीट काढलं, तर माणसांना पूर्ण वेळ बसावंच लागतं. पण कधीकधी प्रेक्षकांमध्ये प्रक्षोभ झाला, तर अनेक चित्रपट बंद पडताना पाहिलेत. आम्ही त्यांच्या चांगल्या कामांना पाठिंबा देऊ, वाईट कामांना विरोध करू”, असं दानवे म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरेंशी घेणार भेट

रावसाहेब दानवे यांनी बुलेट ट्रेनसाठी उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचं देखील सांगितलं आहे. “मला उद्धवजींनी ८ दिवसांपूर्वी फोन केला. ते माझ्याशीही बोलले. माझं दोनदा बोलणं झालं आहे. मी त्यांना भेटायला जाणार आहे. अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनसाठी त्यांना भेटणार आहे. कदाचित या प्रकल्पासाठी त्यांची मनस्थिती झाली असावी. पण बोलल्यानंतर मला कळेल. आमचं भेटायचं ठरलं आहे”, असं ते म्हणाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लष्करी अधिकारी मारवाहला हनी ट्रॅपच्या जळ्यात

News Desk

अयोध्या प्रकरणी २६ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

News Desk

आम्ही दिवे तर लावू, मात्र तुम्ही तज्ज्ञांचे एकदा तरी ऐकावे

swarit