HW News Marathi
महाराष्ट्र

रत्नागिरीतील मरकजहून आलेल्यांपैकी १ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

रत्नागिरी | राज्यात कोरोनाच्या आखड्याचा चढताक्रमचं दिसत आहे. दिल्लीतील निजामुद्दीन येथे तब्लिगी जमातीच्या मरकजमध्ये झालेल्या धार्मिक कार्यक्रमामूळे कोरोनाच्या संख्येत अनेक पटींनी वाढ झाली आहे. दरम्यान, दिल्लीतील नियाजुद्दीन या भागाला कोरोना हॉटस्पॉट असे घोषित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ९०० हून अधिक जणांना या कार्यक्रमात उपस्थिती लावली होती.

रत्नागिरीतील ७ जण या कार्यक्रमाला गेल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. यांपैकी एका रूग्णचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णावर रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या रुग्णालयात मरकजला गेलेल्या ५ जणांना क्वॉरंटाईन करुन ठेवण्यात आले होते. या ५ जणांपैकी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर, कॉरंटाईन करुन ठेवलेल्यांमध्ये १ जम मुंबईचा आणि १ जण आग्र्याचा आहे. रत्नागिरीत आत्तापर्यंत संशयितांची चाचणी केली असता सगळ्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. परंतू, आता मरकजमूळे ही संख्या पुन्हा १ वर गेली आहे.

दरम्यान कोरोनामुळे देशात सध्या लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. देशात हा आकडा १०००च्या पुढे गेला आहे. तरीही, राज्य आणि केंद्र सरकार आरोग्य विभागाच्या मदतीने हा आकडा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, सरकारी, प्रशासकीय पातळीवर देखील याबाबतची सारी खबरदारी घेतली जात आहे. लोकांमध्ये जनजागृती केली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात लवकर आंतरराष्ट्रीय दर्जाचे बोर्ड

swarit

‘मराठा’ विद्यार्थ्यांना न्याय मिळायलाच पाहिजे !

News Desk

अनंत गीते म्हणाले, पवार आमचे गुरू होऊ शकत नाही, तर तटकरे म्हणतात…!

News Desk