HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीस, चंद्रकांत पाटील, राज ठाकरेंसह ‘या’ नेत्यांच्या सुरक्षेत कपात; ठाकरे सरकारचा निर्णय

मुंबई । राज्यातील महाविकासआघाडी सरकारने विरोधी पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांना मोठा दणका दिला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीसांसोबतच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप आमदार प्रसाद लाड, भाजप नेते आशिष शेलार इतकेच नव्हे तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही सुरक्षा व्यवस्थेत ठाकरे सरकारकडून मोठी कपात करण्यात आली आहे.

जीवाला धोका असूनही फडणवीसांच्या सुरक्षेत कपात ?

२ दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ठाकरे सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती मिळते.

मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्यात आल्यानंतर त्यांच्या सुरक्षा ताफ्यातील बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेण्यात येणार आहे. खरंतर, देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल स्वतः मुंबई पोलिसांनी यापूर्वी दिला होता. मात्र, तरीही ठाकरे सरकारकडून त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे.

राज ठाकरेंच्याही सुरक्षेतही कपात

विशेष म्हणजे भाजप नेत्यांसह ठाकरे सरकारकडून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही सुरक्षेत कपात करण्यात येणार आहे. राज ठाकरे यांना यापूर्वी Z सुरक्षा होती. त्यात कपात होऊन आता राज ठाकरे यांना Y+ सुरक्षा देण्यात येणार असल्याची माहिती मिळते.

विरोधकच नव्हे तर काही विद्यमान मंत्र्यांच्याही सुरक्षेत कपात

मिळालेल्या माहितीनुसार, फक्त विरोधी पक्षांतील बड्या नेत्यांच्या नव्हे तर काही विद्यमान मंत्र्यांच्याही सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. ज्यामध्ये संजय बनसोडे, अस्लम शेख यांचा समावेश आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्रकांत पाटलांचा वारसा संग्राम देशमुख चालवणार ? पुणे पदवीधरसाठी भाजपचे उमेदवार !

News Desk

काँग्रेस पक्षाने उघड केलेल्या ‘जलयुक्त शिवार’ योजनेतील भ्रष्टाचाराच्या एसआयटी चौकशीचे स्वागत

News Desk

डिजिटल उपक्रमांना चालना मिळणार दूरसंचार पायाभूत सुविधा निर्मिती धोरणास मान्यता

News Desk