HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोनासंदर्भात उद्या मुख्यमंत्र्यांची बैठक;, नव्या विषाणूवर होणार चर्चा

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत उद्या बैठक आहे. या बैठकीत जागतिक स्तराच्या नव्या विषाणूवर चर्चा करणार असून यासंदर्भात केंद्राशी बोलून काही निर्बंध आणावे लागतील, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (२७ नोव्हेंबर) पुण्यात पत्रकार परिषद घेऊन केली आहे.

सध्या तरी पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटर हटवणार नसल्याची माहिती पवारांनी दिली आहे. उद्याच्या बैठकीत सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त उपस्थित असणार आहेत. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानासंदर्भात केंद्राशी चर्चा करू, असेही पवारांनी सांगितले.

एसटी कर्मचाऱ्यांनी जास्त विषय खेचू नये

तसेच राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा बऱ्यांपैकी पगार वाढलेत, तरी टोकाची भूमिका का, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे. पवारांनी वेतन वाढीनंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीनंतर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. मग सर्वजण उद्या विलीनीकरणाची मागणी करतील. एसटी कर्मचाऱ्यांनी जास्त विषय खेचू नये, असा सल्ला ही पवारांनी दिला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“शुद्धीवर येऊन बोला, मंदिरं बंद ठेवण्याचे आदेश केंद्राचेच”,विजय वडेट्टीवारांची भाजपवर टीका!

News Desk

लढाणा येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा; गुलाबराव पाटील यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

Aprna

 उरण ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लांटमध्ये भीषण आग, ४ जणांचा मृत्यू

News Desk