HW News Marathi
महाराष्ट्र

राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध | मुख्यमंत्री

मुंबई | राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असून त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण केली जाईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. मराठा समाजाच्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांची बैठक बोलावली होती.

ही बैठक सह्याद्रीय अतिथीगृहावर पार पडली असून या बैठकीत मराठा समाजाला निश्चित वेळेत आरक्षण देऊ, असे मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजातील मान्यवरांशी चर्चा केल्यानंतर म्हटले आहे. आंदोलनात हिंसा होऊ नये, आणि कोणीही आत्महतेसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले आहे.

या बैठकीला मुख्यमंत्र्यांसाह महसूल मंत्री चंद्राकांत पाटील, शिक्षण मंत्री विनोद तावडे, शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे, अभिनेते सयाजी शिंदे, अमोल कोल्हे, अभ्यासक पांडुरंग बलकवडे, विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे सुवर्ण कोकण संस्थचे डॉ. सतीश परब आदी मान्यवर उपस्थित होते.

या नेत्यांनी फिरवली पाठ

या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शाहू महाराज, इतिहासकार जयसिंगराव पवार, प्रतापसिंह जाधव यांना निमंत्रण देण्यात आले होते. परंतु या तिघांनी बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला. मराठा समाजाने आतापर्यंत ५८ मूक मोर्चे काढूनही सरकाला त्यांच्या भावना समजल्या नाहीत. मग आता चर्चेचा कायही उपयोग होणार नसल्याची भूमिका यांनी व्यक्त केली.

Related posts

ST कर्मचाऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलू नये यासाठी अनिल परबांचे आवाहन

News Desk

आमचा सिनेमा सुदैवाने बरा चालला आहे!

swarit

प्रदूषण कमी करण्याचे प्रयत्न व्हावेत – मुख्यमंत्री 

News Desk