HW News Marathi
महाराष्ट्र

दीड दिवसांच्या बाप्पाला आज निरोप! भक्तांना अँटिजेन टेस्ट बंधनकारक

ठाणे। राज्यात आज(११ सप्टेंबर ) दीड दिवसांचे गणपती निरोप घेणार आहेत. दीड दिवसांच्या बाप्पाचं आज विसर्जन होणार असल्याने मुंबईसह ठाण्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ठाण्यात तर विसर्जनासाठी येणाऱ्या भक्तांना अँटिजेन टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. विघ्नहर्त्या गणरायाचं काल राज्यात आगमन झालं. वाजतगाजत आणि जयघोष करत बाप्पांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर विधीवत पूजाअर्चा करत बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना केली. आज दीड दिवसांच्या बाप्पांचं आज विसर्जन होत आहे. त्यासाठी ठाणे आणि मुंबई सज्ज झाली आहे.

कडक पोलिस बंदोबस्त

राज्यात ऐन गणेशोत्सवात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर दीड दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी आज(११ सप्टेंबर) कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ठाण्यात बाप्पाच्या स्वागतासाठी 4 हजार पोलिस तैनात ठेवण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गणेशोत्सवातील शांततेसाठी 200 पेक्षा अधिक उपद्रवी व्यक्तींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ठाण्यात एक लाख 41 हजार 20 घरगुती तर 1 हजार 58 सार्वजनिक बाप्पांचे ठाण्यात विराजमान होणार आहे.

ऑनलाईन बुकींग

गणेश विसर्जन करताना कोरोना नियमांचे पालन व्हावे म्हणून ठाणे महापालिकेच्या डिजीठाणे प्रणालीद्वारे यावर्षीही ऑनलाईन गणेश विसर्जन टाईमस्लॅाट बुकिंग सुविधा सुरू केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनाच्यावेळी गर्दी होवू नये यासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात गणेशमूर्ती विसर्जनासाठी डिजीठाणे प्रणाली मार्फत ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंग सुविधा 1 सप्टेंबर पासून सुरू करण्यात आली आहे. यावर्षी गणेश विसर्जनासाठी ठाणे महानगरपालिकेकडून एकूण 40 स्थाने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामध्ये 7 घाट, 13 कृत्रिम तलाव आणि 20 स्वीकृती केंद्रांचा समावेश आहे. डिजीठाणे प्रणालीद्वारे मूर्ती विसर्जन करण्यासाठी ऑनलाईन टाईमस्लॉट बुकिंग सुविधा 13 कृत्रिम तलाव आणि 20 स्वीकृती केंद्रांवर उपलब्ध असणार आहे. सदर ठिकाणी श्रींचे विसर्जन करण्यासाठी डिजीठाणे प्रणाली मार्फत तयार केल्या गेलेल्या www.ganeshvisarjan.covidthane.org या संकेतस्थळावर विसर्जनाचा टाइमस्लॉट बुक करावा.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१० टक्के वाढीची पिपाणी वाजवून केंद्र सरकारने जिंकल्याचा आव आणू नये – सामना

News Desk

विदर्भ एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

News Desk

पुनर्विकासासाठी  म्हाडा सर्वतोपरी प्रयत्नशील! –  जितेंद्र आव्हाड

Aprna