Site icon HW News Marathi

राज्यातील 1 हजार 79 ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला सुरुवात; थोड्याच वेळात चित्र होणार स्पष्ट

मुंबई | राज्यातील 18 जिल्ह्यातील  82 तालुक्यातील 1 हजार 166 ग्रामपंचायती आणि थेर सरपंचपदाच्या (Maharashtra Gram Panchayat Election) निवडणुका आज जाहीर होणार आहेत. तर एकूण 87 ग्रापंचायतीवर बिनविरोध सरपंचाची निवड झालेल आहे. यामुळे आता 1 हजार 79 ग्रामंपचायीचा आज (17 ऑक्टबर) 10 वाजता सुरू झाली आहे. ग्रामपंचायतीचे निकाल हाती येण्यास सुरुवता झालेली आहे. यात नाशिकचे ग्रापंचायतीचा निकाल झाहीर झाला आहे.

या निवडणुकीत शिवसेनेचे दोन गट पडलेले असून त्यांचे नाव आणि चिन्ह देखील बदलेल्यानंतर ही पहिली निवडणूक आहे. यामुळे निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतमोजणीला सुरुवात झालेली आहे.  थोड्याच वेळात निकाल हाती येतील आणि सर्व चित्र स्पष्ट होईल. राज्यातील ग्रामपंचायतीमधील निवडणुकांमध्ये सरपंचाची निवड थेट जनतेमधून करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम -१९५८ च्या कलमांमध्ये सुधारणा करण्याच निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

दरम्यान, ग्रामपंचायतीचे निकाल हाती येण्यास सुरुवात झालेली आहे. यात नाशिक जिल्ह्यातील दोन ग्रापंचायतींचा निकाल जाहीर झाला आहे. यात सुरगाणाच्या उंबर पाडा दिंगरमध्ये स्थानिक विकास आघाडीचे चिमण पवार यांचा विजय झाला आहे. तर नाशिकच्या वेळे ग्रापपंचायतीवर शिंदे गटाचा उमेदवार विजय झाला आहे.

 

 

Exit mobile version