HW News Marathi
महाराष्ट्र

पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारख्यान्यात झाली चोरी 

बीड | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी तालुक्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारख्यान्यात चोरी झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कारखान्याच्या वर्कशॉप आणि स्टोअरमधून तब्बल ३७ लाख ८४ हजार रुपयांचं साहित्य चोरी गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी आज (२२ डिसेंबर) परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. यावर आता पंकजा मुंडे काय बोलणार, हे प्रकरण कसे हाताळले जाणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात स्टोअर गोडाऊन आणि एक वर्कशॉप गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये १७ ऑक्टोबर २०२० ला चोरी झाली होती. त्याची माहिती स्टोअर किपर जी.टी. मुंडे यांच्याकडून कारखान्याचे लिपिक आणि लीगल इन्चार्ज जमीन शेख यांना कळवण्यात आली. त्यानंतर लिपिक आणि लीगल इन्चार्ज यांनी चोरीच्या ठिकाणाची पाहणी केली. त्यावेळी स्टोअर आणि वर्कशॉपच्या मागील बाजूचं शटर उचकटल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं.

कारखान्यातील काय काय गेले चोरीला?

चोरीच्या या घटनेत एकूण ३७ लाख ८४ हजार रुपयांचं साहित्य लंपास करण्यात आलं आहे. त्यात कारखान्याचे संगणक, कपर मटेरियल, मिल बेअरिंग, बुश साऊंड बार अशा अनेक वस्तूंचा समावेश आहे. या प्रकरणात 22 डिसेंबर रोजी परळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा तपासाला सुरुवात केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरेंचा मलाही फोन, लवकरच आम्ही भेटणार, मुनगंटीवारांचं मोठं वक्तव्य

News Desk

राज्याला २६ नव्हे तर ५० हजार दिवसाला रेमडेसिवीर इंजेक्शन द्या – नवाब मलिक

News Desk

“परळीची जनता फार हुशार! कोणाला किती उडू द्यायचे आणि कोणाची पतंग कधी कापायची हे चांगलचं माहीत” – पंकजा मुंडे

News Desk