HW News Marathi
महाराष्ट्र

रोहित पवारांनी घेतली प्रविण दरेकरांची भेट, राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची भेट घेतली आहे. रोहित पवार आणि दरेकरांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आले आहे. रोहित पवार चक्क प्रवीण दरेकर यांना भेटल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या दोन्ही नेत्यांची आज (१९ मार्च) सकाळी भेट झाली असून या भेटीच नेमकं कारण अजून गुलदस्त्यात आहे. प्रवीण दरेकर यांचं सरकारी निवासस्थान अवंती इथे जाऊन रोहित पवार यांनी ही भेट घेतली आहे.

दरम्यान, राज्यातील एकूण स्थिती पाहता प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सध्या महाविकासआघाडी सरकारला धारेवर धरलं आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण असो किंवा पूजा चव्हाणची आत्महत्या असो या सगळ्या प्रकरणावरुन भाजप सध्या सरकारला टार्गेट करत टोला लगावत आहे. त्यामुळे असं असताना रोहित पवार यांनी प्रविण दरेकरांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरला आहे.

प्रवीण दरेकर हे मुंबै बँकेचे संचालकही आहेत. रोहित पवार यांचं त्यासंबंधित काही काम होतं काअसा प्रश्न आहे. राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील संबंध राज्याला माहिती आहेत. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, भाजपने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोणत्याही परिस्थितीत औरंगाबादचे नामांतर होणारच – संजय राऊत

News Desk

राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध | मुख्यमंत्री

swarit

‘सामना’च्या संपादकपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर रश्मी ठाकरेंनी भाजपच्या ‘या’ नेत्यावर केली टीका

News Desk