HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंसाठी पवारांचे नातू आले धावून..थेट पंतप्रधानांनाचं केलं टार्गेट !

मुंबई| मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर बसून राज्याचा कारभार चालवतात अशी टिका वारंवार भाजपकडून केली जाते. कोरोनाकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात बसून आहेत , अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी केली होती. भाजपने मुख्यमंत्र्यांवर टिका केल्यानंतर उद्धव ठाकरेंसाठी पवारांचे नातू रोहित पवार धावून आले आहेत.

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाही म्हणत आहे. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे आहेत. ते देखील ऑफिसमध्येच बसून काम करताय ना? ‘ असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. तसेच जीएसटीचा फंड मिळत नसतानाही राज्य सरकार चांगले काम करत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्वाधिक काळ घरात राहणारे उद्धव ठाकरे राज्याच्या इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री असतील’ असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला होता. तसेच माझ्यासह माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील राज्यभर फिरत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांना घराबाहेर पडायला वेळ नाही, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली होती.

कोरोनाकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधी पुण्याचा दौरा केला होता आणि कोकणात चक्रीवादळ आल्यानंतर त्या ठिकाणची पाहणी त्यांना केली होती. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाकाळात संपुर्ण राज्याचा दौरा केला तसेच आता विदर्भातील पुराची पाहणी करण्याकरता ही त्यांचा दौरा सुरू आहे. या सगळ्या पार्शवभूमिवर विरोधी पक्षांकडून वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“‘मविआ’चा एक घटक पक्ष म्हणून पुढे वाटचाल कराला कोणाची हरकत नाही”, ठाकरेंचा आंबेडकरांना सल्ला

Aprna

एसटी संपाचा तिढा कायम

News Desk

कुर्ल्यातील पालिकेच्या शाळेला वाळवी, नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी व्यक्त केली चिंता

News Desk