HW News Marathi
महाराष्ट्र

“‘लाव रे तो व्हिडिओ…’ च्या वादळी सभांमुळं”, रोहित पवारांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

पुणे | राजकारणता सध्या मनसे आणि राष्ट्रवादीचा वाद चर्चेत आहेत. महाराष्ट्रातील जातीय द्वेषाला राष्ट्रवादीच जबाबदार असल्याचं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. त्यामुळे एकच गदारोळ निर्माण झाला आहे. राज यांच्या या विधानाला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पहिल्यांदाच प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच राज ठाकरे यांच्या म्हणण्याचं विश्लेषणही रोहित पवार यांनी केलं आहे.

‘लाव रे तो व्हिडिओ’

रोहित पवारांनी दोन ट्विट करत राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, “साहेब हे अद्भूत वक्तृत्व शैली असलेले नेते आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘लाव रे तो व्हिडिओ…’ च्या वादळी सभांमुळं उडालेली धूळ डोळ्यात गेल्याने भाजपचे भले-भले नेते अजूनही डोळे चोळतायेत. त्यामुळं त्यांच्या प्रत्येक शब्दाला एक वेगळा अर्थ असतो”, असं त्यांनी पहिल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे.

डोक्यावर घेतलेल्या या पक्षाला खाली आणायचं असेल तर

रोहित पवारांनी दुसरा ट्विट देखील केलं आहे. ते म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर लगेच लोकांनी डोक्यावर घेतलेल्या या पक्षाला खाली आणायचं असेल तर एकच पर्याय होता, तो म्हणजे जातीयवाद वाढवणं! म्हणून विरोधकांनी विकासाऐवजी जाती-धर्माच्या नावावर समाजात ताण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असाच राज साहेबांच्या बोलण्याचा अर्थ निघतोय!”

राज ठाकरे काय म्हणाले?

अजूनही आपण जातीपातीमध्ये खितपत पडलो आहोत. स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतरही निवडणुकीत भाषणं होतात तेव्हा सगळ्यांकडून सारखं रस्ते, पाणी, विज अशी तिच तिच आश्वासनं दिली जात आहेत. तेव्हा एवढ्या वर्षात आपण काय केलं हे शोधलं पाहिजे. साधारणपणे आपण 99 साल पाहिलं तर त्यापूर्वी महाराष्ट्रात जातीपाती होत्याच. पण 99 नंतर जातीपातींमध्ये द्वेष वाढला, हे माझं वाक्य होतं. राष्ट्रवादीच्या निर्माणानंतर तो वाढला असं मी म्हणालो होतो, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा अधिक सक्षम करणार – फडणवीस

Manasi Devkar

कुपोषणमुक्त मुंबईसाठी ७१ नागरी बाल विकास केंद्र कार्यान्वित! – यशोमती ठाकूर

News Desk

चार महिन्यात चार डीजी निवृत्ती होणार

News Desk