HW News Marathi
महाराष्ट्र

आमचे पुढचे लक्ष्य हे पेट्रोलपंपावर लावलेले पंतप्रधान मोदीजींचे फ्लेक्स असेल – रुपाली चाकणकर 

मुंबई | गॅसचे दर कमी केले नाहीत तर आमचे पुढचे लक्ष्य हे पेट्रोलपंपावर लावलेले सन्माननीय पंतप्रधान मोदीजींचे फ्लेक्स असेल, इतकं लक्षात असू द्या असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने आज राज्यभरात केंद्रसरकारने केलेल्या गॅस सिलेंडर दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. पुण्यातील मंडई येथे महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी चूल पेटवून दर वाढीचा निषेध नोंदविला.

मागील १५ दिवसामध्ये केंद्रातील भाजपा सरकारने एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये १०० रुपयांनी वाढ केली आहे. मागील एक वर्षामध्ये कोरोना कालावधीत लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालाय, अर्थव्यवस्था कोलमडली आहे.

अशी परिस्थिती असताना केंद्रसरकार देशातील सामान्य नागरिकांना स्वस्त दरामध्ये स्वयंपाकासाठी वापरला जाणार एलपीजी गॅस आणि इंधन उपलब्ध करुन दिलासा देणारा निर्णय घेण्याऐवजी असंवेदनशीलता दाखवत दरवाढ केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या रिक्त जागेवर नाना पटोलेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

News Desk

बीडमध्ये मंदिर उघडण्यासाठी शंखनाद करत केले अनोखं आंदोलन!

News Desk

अमित शहांनी संपूर्ण भाषणात शिवसेना आणि उद्धव ठाकरे टार्गेट केले हेच आमचे यश – विनायक राऊत

News Desk