HW News Marathi
महाराष्ट्र

“अनिल देशमुख यांच्याविरोधात एकही पुरावा सापडला, मग कारवाई कुणाच्या इशाऱ्यावर?” सचिन सावंत

मुंबई। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना CBI ने क्लीनचिट दिली आहे यावरून आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगात आहे आणि नवीन वादांना तोंड फुटलं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सीबीआयचे उपअधीक्षक आर एस गुंजाळ यांच्या चौकशी अहवालाची माहिती देत मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. सीबीआयच्या अहवालात अनिल देशमुख यांच्याविरोधात एकही पुरावा सापडला नसल्याचं म्हटलं. त्यानंतरही मग सीबीआयने कुणाच्या इशाऱ्यावर कारवाई केली? असा सवाल सावंत यांनी उपस्थित केलाय. तसेच हे सर्व अनिल देशमुख आणि महाविकासआघाडीला बदनाम करण्याचं मोदी सरकारचं षडयंत्र असल्याचा आरोप करत याची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.

मोदी सरकारचे षड्यंत्र उघड झाले

सचिन सावंत यांनी ट्विट करत त्यांच्या मुद्दा मांडला आहे. सचिन सावंत म्हणाले, “अनिल देशमुख आणि मविआला बदनाम करण्याचे मोदी सरकारचे षड्यंत्र उघड झाले आहे. प्राथमिक चौकशीत सीबीआयच्या तपास अधिकाऱ्याने असा निष्कर्ष काढला होता की परमबीर सिंह यांनी केलेल्या तथाकथित 100 कोटी रुपये वसुली आरोपात अनिल देशमुख यांची कोणतीही भूमिका नाही आणि चौकशी बंद केली होती.”

सीबीआयने भूमिका कोणाच्या इशाऱ्यावर बदलली

“तपास अधिकाऱ्याच्या अहवालाला बाजूला सारून सीबीआयने भूमिका कोणाच्या इशाऱ्यावर बदलली हे शोधण्यासाठी या षडयंत्राची सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन चौकशी व्हावी. उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशी करा असे सांगितले असताना न्यायालयाची दिशाभूल करून FIR नोंदवणे हा CBI चा मोठा गुन्हा आहे,” असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.

गृहमंत्री अमित शहा यांनी जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा दिला पाहिजे

“गृहमंत्री अमित शहा यांनी जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. या यंत्रणा मोदी सरकारच्या विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी राजकीय शस्त्र कसे बनतात याचे हे स्पष्ट उदाहरण आहे. न्यायालयाची दिशाभूल केली जाते, नियम गुंडाळले जातात, चौकशा अंतहीन ठेवल्या जातात. अशी षड्यंत्रे फक्त हुकुमशाहीत घडतात. लोकशाही वाचवण्यासाठी संपूर्ण देश एकत्र येण्याची वेळ आली आहे,” असंही सचिन सावंत यांनी सांगितलं. यावेळी सचिन सावंत यांनी या सर्व प्रकाराचा जाहीर निषेधही केला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कधी कधी लोकांना फार विनोद करण्याची मध्येच हुक्की येते’ – छगन भुजबळ

News Desk

पुण्यात व्यापाऱ्यांची आक्रमक भूमिका, आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा!

News Desk

एनसीबी पथक रिया चक्रवर्तीच्या घरी दाखल!

News Desk