HW News Marathi
देश / विदेश

‘मोदींनी कोत्या मनोवृत्तीच्या राजकारणात त्यांचे नाव ओढले’, सचिन सावंतांची संतप्त प्रतिक्रिया

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचं नाव बदलून आता मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार केलं आहे. यावरून आता काँग्रेसचे नेते खूपच आक्रमक झालेले दिसून येत आहेत. मी त्यांच्या मतांसाठी आभार मानतो, असं म्हटलं आहे. त्यांच्या भावनांचा आदर करत खेलरत्न पुरस्कार आतापासून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार नावानं ओळखला जाईल, असं म्हटलं. यापूर्वी या पुरस्काराला माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचं नाव देण्यात आलं होतं. दरम्यान, खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलण्यावरुन काँग्रेसनं पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे.

मोदी कोत्या मनोवृत्तीचे

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मोदींवर टीका करत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत नाराजी दर्शवली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केलीय. ‘राजीव गांधी खेळरत्न पुरस्काराचे नामकरण मेजर ध्यानचंद खेलरत्न होत आहे. मेजर ध्यानचंद यांचे नाव कोणत्याही ठिकाणी व पुरस्काराला देण्याचे स्वागतच आहे. त्यांच्या नावाने सर्वोत्तम खेळ पुरस्कार 2002 पासून आधी आहेच. दुर्दैवाने मोदींनी कोत्या मनोवृत्तीच्या राजकारणात त्यांचे नाव ओढले आहे’, अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे.

कितीही प्रयत्न केला तरी राजीवजींचे स्थान हलणार नाही

त्याचबरोबर, ‘शहीद राजीव गांधी हे देशाचे सुपुत्र व हिरो होते. त्यामुळे मोदींनी कितीही प्रयत्न केला तरी राजीवजींचे स्थान हलणार नाही. स्वतःची लाईन वाढत नाही तर दुसऱ्याची कमी करणे ही मोदींची मानसिकता आहे. तरीही जर खेळाडूंचे नाव देण्याची तात्विक भूमिका असेल. तर मोदी व जेटली यांच्या नाव ज्या स्टेडियमना दिले आहे ते बदलून दिग्गज खेळाडूंचे नाव देण्याची सुरुवात करा. सरदार पटेलांचे नाव छोटं करुन हयातीतच स्वतःचे नाव स्टेडियमला देणारे मोदी निश्चितपणे याचा विचार करतील ही अपेक्षा. मेजर ध्यानचंद अमर रहे! राजीव गांधी अमर रहे!’, असा खोचक टोलाही सावंत यांनी मोदींना लगावला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमेरिकेत कोरोनावर आळा घालण्यासाठी ट्रम्प यांनी आखली ‘३ फेज’ची योजना

News Desk

अण्णा हजारे यांचे उपोषण मागे

News Desk

दोन्ही PA अटकेत, आता अनिल देशमुखांवरही टांगती तलवार

News Desk