HW News Marathi
महाराष्ट्र

आमदार गोपीचंद पडळकर नक्की मंत्री होणार ! सदाभाऊंनी व्यक्त केला विश्वास

सांगली । “गोपीचंद पडळकर टीव्हीवर आले की आज हा माणूस कुणाला काय बोलणार हे बघण्यासाठी लोकं टीव्हीसमोर थांबतात.त्यामुळे पडळकर आता मंत्री पदासाठी तुमचाच नंबर आहे. तुम्ही १०० टक्के मंत्री होणार आहे. कारण गोपीचंद पडळकर यांचा सध्या महाराष्ट्रामध्ये TRP जास्त आहे”, अशी स्तुतीसुमने रयत क्रांती सेनेच्या सदाभाऊ खोत यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर उधळली आहेत.

“गोपीचंद बारका गडीय पण अख्खा महाराष्ट्र त्यांना ओळखतो. लेनन गाडी कितीही मोठी असू द्या पण एवढ्याएवढया जॅकवर ती गाडी उचलली जाते, असे गोपीचंद पडळकराचे काम आहे”, असेही सदाभाऊ खोत म्हणाले आहेत. “आम्ही चुकून आमदार झालोय” असे म्हणत खोत यांनी मला आमदारकी कशी मिळालीय हे सगळ्यांना माहीत असल्याचे सांगितले. “इडा पीडा टाळू आणि सदाभाऊ ना आमदारकी मिळू दे असे मी आमदार झालोय”, असे खोत म्हणाले.

हिंदकेसरी पै.मारुती माने यांच्या ८३ व्या जयंतीनिमित्त पै.भीमराव माने युथ फौंऊंडेशन व हिंदकेसरी व्हॉलीबॉल स्पोर्ट्स क्लब कवठेपिरान यांचे वतीने व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही स्पर्धा पार पडली. यावेळी खोत बोलत होते.यावेळी नूतन सरपंच व उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कारही आमदार खोत आणि पडळकर यांच्याहस्ते पार पडला. व्हॉलीबॉल स्पर्धांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आमदार पडळकर आणि खोत यांचा व्हॉलीबॉलचा सामना रंगला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जोरजबरदस्ती करुन, घोडेबाजारात रान पेटवूनही एखादे सरकार पडता येत नसेल तर मनाचा गोंधळ उडतो

News Desk

राज्याच्या विकासाला चालना देणारा, सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प ! – नाना पटोले

Aprna

…तर राष्ट्रवादीचा मीच करेक्ट कार्यक्रम करेन; राजू शेट्टींचा इशारा

News Desk