HW News Marathi
महाराष्ट्र

‘साहेब आम्ही तुमच्या सदैव सोबत’, अनिल परबांच्या समर्थनासाठी शिवसैनिक पुढे सरसावले!

मुंबई। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपने अनिल परब यांना टार्गेट केलं असून त्यांची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. यात आता शिवसैनिक अनिल परब यांच्या समर्थनासाठी पुढे सरसावले आहेत. साहेब आम्ही तुमच्या सदैव सोबत आहोत, अशा आशयाचे बॅनर्स मुंबईमध्ये लावण्यात आले आहेत. मुंबई उपनगरातील जोगेश्वरी परिसरात अनिल परब यांच्या समर्थनार्थ बॅनर्स लावण्यात आले आहेत. “संकटाच्या छाताडावर तांडव करणाऱ्यांनाच शिवसैनिक म्हणतात, अनिल परब साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत,” असा मजकूर या फलकांवर झळकत आहे. त्यामुळे भाजपच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी आणि अनिल परब यांचा बचाव करण्यासाठी शिवसेनेनेही जोरदार तयारी सुरु केली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण!

नारायण राणे यांना अटक करण्यापूर्वी भाजप नेते ठिय्या मारुन बसले होते. अटक वॉरंट दाखवा, तरच कारवाई करा, अटक वॉरंट असेल तर आम्ही स्वत: गाडीत येऊन बसतो असं भाजप नेते सांगत होते. तसंच पोलिसांवर राजकीय दबाव आहे, कारवाई करण्याचे आदेश येत आहेत, असंही भाजप नेते म्हणत होते.

भाजपच्या या दाव्यानंतर अनिल परब यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ समोर आला आहे. अनिल परब यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना पोलिसांचे फोन येत होते. त्यामुळे नारायण राणे यांच्या अटक नाट्याची सर्व सूत्रे अनिल परब यांनीच हाताळल्याचे बोलले जाते. यानंतर भाजपने याविरोधात कोर्टात जाणार असल्याचा ईशारा दिला आहे. परब यांच्याविरोधात थेट कोर्टात जाणार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही सरकार पाडणार नाही, पण पडेल त्या दिवशी अल्टरनेट देऊ, फडणवीसांचं महत्वाचं विधान

News Desk

कुमार मंगलम बिर्ला, सुमन कल्याणपूर यांना पद्म भूषण तर ४ मान्यवर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

Aprna

चंद्रकांत पाटलांचा वारसा संग्राम देशमुख चालवणार ? पुणे पदवीधरसाठी भाजपचे उमेदवार !

News Desk