HW News Marathi
महाराष्ट्र

साकीनाक्यातील बलात्कार प्रकरणातील महिलेचा मृत्यू!

मुंबई। मुंबई साकीनाका भागात काल( १० सप्टेंबर) रात्री एका महिलेवर बलात्कार करण्यात आला होता. त्या पीडित महिलेचा आज(११ सप्टेंबर) दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. पीडित महिलेवर घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु होते, उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत्ये. या महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला होता. या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली. या महिलेची प्रकृती गंभीर होती. तिच्यावर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मोहन चौहानला बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

शुक्रवारी पोलिस नियंत्रण कक्षाला एका व्यक्तीचा फोन आला असून खैरानी रोडवर एक व्यक्ती महिलेला मारहाण करत असल्याची माहिती दिली. पोलिस तिथे पोहोचली आणि रक्ताच्या थारोळ्यात ती महिला जखमी आढळली. तिला तात्काळ घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात भरती करण्यात आली, पोलिसांच्या प्राथमिक तपासात महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात रॉड घुसवलेला आढळून आला.

काय म्हणाले गृहमंत्री

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही खंत व्यक्त केली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी साकीनाका बलात्कार प्रकरण अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक असल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत तिचा जबाब झाल्यानंतर खरी परिस्थिती समोर येईल. जी काही कठोर शिक्षा आहे ती केली जाईलच, पोलीस खात्याला मी यासंदर्भात कालच सूचना दिलेल्या आहेत. यामध्ये तपास सुरु आहेय. आणखी कोणी आरोपी आहेत का त्याचाही तपास घेण्याच्या सूचना करण्यात आल्यात. या घटनेचा वेळोवेळी अहवाल मला द्या अशा सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले होते. मात्र आता पीडित महिलेचा मृत्यू झाल्याने प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर मला राऊतांनी जोड्याने मारावे! – किरीट सोमय्या

Aprna

“बाळासाहेब गेले मात्र ठाकरे भाषा तिथेच संपली”, नारायण राणेंचं वक्तव्य!

News Desk

वानखेडेंचे वैयक्तिक आयुष्य आणि ड्रग्जचा काय संबंध? क्रांती रेडकर भडकल्या

News Desk