HW News Marathi
महाराष्ट्र

“मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात जावे म्हणून आता कोर्टात याचिका करायची की आंदोलन”, संदीप देशपांडेंचा टोला

मुंबई | मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी लोकल संबंधित निर्णय दिला असून आता ते विरोधकांच्या टीकेचं कारण बनले आहेत. भाजपनंतर आता मनसेनेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आपण मंत्रालयात बसून लोकांचे प्रश्न येत्या १५ ऑगस्टपासून सोडवाल, यासाठी याचिका करू का आंदोलन हे ही सांगा, असा टोला लगावला आहे.

काय आहे ट्विट?

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत मुख्यमंत्रयांना टोला लगावला आहे. “आंदोलनं, याचिका, पत्र, विनंती, त्रागा, धमकी, बातमी लावून धरणं आणि इतर अनेक उपाय या माध्यमातून लोकल १५ ऑगस्टला चालू करण्याची आपण घोषणा केली. असो, आपलं अभिनंदन. आता आपण मंत्रालयात बसून लोकांचे प्रश्न येत्या १५ ऑगस्टपासून सोडवाल यासाठी याचिका करू की आंदोलन? हेही सांगा,” असं ट्विट संदीप देशपांडेंनी केलं आहे.

मुख्यमंत्री क्वचित मंत्रालयात दाखल

कोरोना महामारी चालू झाल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे क्वचितच मंत्रालयात गेले आहेत, असाही आरोप संदीप देशपांडेंनी केला आहे. त्यावरून विरोधकांनी वेळोवेळी त्यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत, असा विरोधकांचा प्रश्न आहे. तोच धागा पकडून देशपांडे यांनी आपल्या ट्वीटमध्ये मंत्रालयाचा उल्लेख केल्याचे सांगितले जात आहे.

कोरोनाच्या नव्या रुग्णांचा ग्राफ कमी झाल्यानंतर सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करावी, यासाठी सातत्याने सरकारकडे मागणी केली जात होती. भाजपसह अन्य पक्ष, संघटना यांनी आंदोलनेही केली. अखेर लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी १५ ऑगस्टनंतर रेल्वे सुरू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. यानंतर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात पावसामुळे मृत व्यक्तींचा आकडा १४५ वर

News Desk

‘युवासेनेच्या संवाद मेळाव्यात गर्दी जमवणे पडलं महागात’, शिवसेना नेत्यावर गुन्हा दाखल!

News Desk

कांदा निर्यात बंदीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा  – छगन भुजबळ

News Desk