HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदावरुन संजय निरुपम यांची हकालपट्टी ?

मुंबई | काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून मुंबई काँग्रेसच्या नेतृत्त्वबदलासाठी मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरु झाल्या आहेत. आगामी २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून महाआघाडी उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना त्यांच्या पदावरुन हटविण्याची मागणी काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांच्या गटासह दिवंगत नेते गुरुदास कामत यांच्या समर्थकांनी केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

दरम्यान, नेतृत्व बदलाच्या मागणी संदर्भात काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी राज्य काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जु खरगे यांची भेट घेऊन संजय निरुपम यांना पदावरुन पायउतार करावे, अशी मागणी करण्यात आली. मिलिंद देवरा हे काँग्रसेमधील सर्व गटांना एकत्र बांधून ठेवतील, असा विश्वास व्यक्त करत निरुपम यांच्या ऐवजी देवरा यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करावी, अशी मागणी या नेत्यांकडून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या सर्व नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Live Update : महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर महाविकासआघाडीचे आंदोलन सुरू

Aprna

‘मुंबई, महाराष्ट्रानं अनेक लोकांना धनवान केलंय’, राऊतांचा विरोधकांना टोला

News Desk

शाळकरी मुलांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या वाळू माफियांवर गुन्हा दाखल करा; पंकजा मुंडेंची मागणी

Aprna