HW News Marathi
महाराष्ट्र

“राणेंनी स्वतःला महान समजणं बंद केलं तरी…..” सामनातून राणेंवर पुन्हा हल्लाबोल!

मुंबई। राजकीय वर्तुळात सध्या शिवसेना विरुद्ध नारायण राणे असं युद्ध पाहायला मिळतंय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपशब्द काढल्याने नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता, मात्र त्यांना तत्कालीन जमीनही मंजूर झाला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत टाटांच्या बिनधास्त आणि बेधडक भाष्यासाठी ओळखले जातात. कालच्या(२५ ऑगस्ट) सामना अग्रलेखातून त्यांनी नारायण राणेंवर टीका केली होती आणि त्याचं प्रत्युत्तरही भाजप कडून आलं होतं. आज(२६ ऑगस्ट) पुन्हा संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून नारायण राणेंवर निशाणा साधला आहे.

मंत्रिपदाची हवा गेली असेल तर ती मोदीच काढणार हे नक्की

नारायण राणे यांनी स्वतःला महान समजणे बंद केलं तर त्यांच्या आयुष्यातील बऱ्याच समस्या कोणत्याही औषधांशिवाय बऱ्या होतील व त्यांचा संसर्ग होण्यापासून भाजपही वाचेल, असा टोला लगावत राणेंच्या डोक्यात मंत्रिपदाची हवा गेली असेल तर ती मोदीच काढणार हे नक्की अशी टीका त्यांनी अग्रलेखातून केली आहे.

राणे व त्यांची तळी उचलून धरणारे भाजपमधील नतद्रष्ट जबाबदार

राणे यांना अटक होणे व त्यानंतर रस्त्यावर हंगामा होणे, कार्यकर्त्यांशी संघर्ष होणे, कार्यालयांवर हल्ला करणे हे आजपर्यंत कधीच झाले नव्हते. त्यास सर्वस्वी राणे व त्यांची तळी उचलून धरणारे भाजपमधील नतद्रष्ट जबाबदार आहेत. शिवसेना-भाजपमध्ये आतापर्यंत वादाचे अनेक विषय झाले, पण एकमेकांवर चाल करून जाणे असे प्रकार घडले नव्हते.

मुल्ला ओमरसारखे लोक भाजपात आले

मुल्ला ओमरसारखे लोक भाजपात आले तर त्यांच्याही समर्थनासाठी डोक्याला तेल फासून ते उभे राहतील. त्यामुळे ही जबाबदारी भाजपातील शहाण्यांवरच आहे. पुन्हा तेथे बाहेरून आलेल्या दीडशहाणे व अतिशहाण्यांची फौज निर्माण झाली आहे ती वेगळीच. त्यामुळे भाजपात अतिशहाणपणाचे जे अजीर्ण झाले ते राज्याच्या स्वच्छ वातावरणासाठी धोकादायक आहे. राज्यातील पर्यावरण कार्यकर्त्यांसाठी हे आव्हान आहे.

स्वतःला महान समजणे बंद केले तर

राणे यांनी स्वतःला महान समजणे बंद केले तर त्यांच्या आयुष्यातील बऱ्याच समस्या कोणत्याही औषधांशिवाय बऱ्या होतील व त्यांचा संसर्ग होण्यापासून भाजपही वाचेल. मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री म्हणून ते महान किंवा असामान्य झाले असतील तर त्यांच्या डोक्यातली हवा मोदीच काढतील हे पक्के. पंतप्रधान मोदी हेच त्यांच्या मंत्रिमंडळात सबकुछ आहेत. मंत्री येतात व जातात. मोदी हे स्वतःला फकीर समजतात व राणे ‘महान’ हा फरक समजून घेतला तर राणे हे केंद्रीय मंत्रिमंडळातले थोड्याच दिवसांचे ‘मेहमान’ आहेत याविषयी फडणवीसांच्या मनातही शंका नसावी.

राणे, प्रसाद लाड हे मूळ भाजपवाले नसलेले ‘बाटगे’

राणे, प्रसाद लाड हे मूळ भाजपवाले नसलेले ‘बाटगे’ भाजपनिष्ठेची जोरात बांग देऊ लागल्यावर ते घडले हे समजून घेतले पाहिजे. राणे व लाड यांच्यासारखे फुटकळ लोक कधीपासून हिंदुत्ववादी झाले? भाडोत्री लोकांच्या खांद्यावर बंदुका ठेवून कोणी शिवसेनेवर हल्ले करू पाहत असतील तर त्यांनी आपल्या गोवऱ्या आताच सोनापुरात रचून याव्यात. शिवसेनेचे हृदय वाघाचे आहे. शिवसेना अशा लढाया स्वबळावरच लढत आली आहे. त्यांना राणे, लाडसारखे भाडोत्री लोक लागत नाहीत.

अबलेवर एखाद्याने अत्याचार केला, पण त्याच्या मनात तशी काही विकृत भावना नव्हतीच

”राणे यांनी मुख्यमंत्र्यांना मारण्याचे वक्तव्य केले ते आम्हाला मान्य नाही, पण राणेंवरील कारवाई योग्य नाही,” हे विधान फडणवीस वगैरे लोक करतात ते कोणत्या आधारावर? अबलेवर एखाद्याने अत्याचार केला, पण त्याच्या मनात तशी काही विकृत भावना नव्हतीच हो, तेव्हा आरोपीला निर्दोष सोडा व पुढचे गुन्हे करण्यासाठी मोकळीक द्या, अशाच प्रकारचा हा युक्तिवाद आहे. काही काळ वकिली (फौजदारी) करणाऱ्या फडणवीसांकडून ही अपेक्षा नाही.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ग्रामीण जीवन, संस्कृतीशी नाते सांगणाऱ्या साहित्यिकांना पुरस्कार जाहीर झाल्याने ग्रामीण युवकांना प्रेरणा मिळेल – अजित पवार

Aprna

आवाजी मतदानाने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घटनाबाह्य नाही! – नाना पटोले

Aprna

राज्यात सामाजिक समता सप्ताह सुरु

News Desk